Banana Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Banana Cluster : पुणे जिल्ह्यात होणार केळीचे क्लस्टर ; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी ः क्षेत्र वाढीसाठी समूह पद्धतीने विकास करणार

Banana Production : आगामी पाच वर्षांत जिल्ह्यात केळी पिकाखाली अधिकाधिक क्षेत्र आणण्यासह उत्पादकता वाढविणे, प्रक्रिया उद्योग, शीतसाखळी निर्मिती आणि बाजारपेठ जोडणी या सर्व बाबींचे नियोजन करत समूह (क्लस्टर) पद्धतीने विकास करण्यात येणार आहे.

Team Agrowon

अॅग्रोवन वृत्तसेवा
Pune News : पुणे : आगामी पाच वर्षांत जिल्ह्यात केळी पिकाखाली अधिकाधिक क्षेत्र आणण्यासह उत्पादकता वाढविणे, प्रक्रिया उद्योग, शीतसाखळी निर्मिती आणि बाजारपेठ जोडणी या सर्व बाबींचे नियोजन करत समूह (क्लस्टर) पद्धतीने विकास करण्यात येणार आहे. त्यासाठी कृषी विभागासह सर्व संबंधित विभागांनी एकत्रित प्रयत्न करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते मंगळवारी (ता.११) बोलत होते. या वेळी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी संजय काचोळे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक सूरज मडके, जिल्हा नियोजन अधिकारी किरण इंदलकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महानंद माने आदी उपस्थित होते. स्ट्रॉबेरी, मिरची, आंबा, स्वीट कॉर्न व बेबी कॉर्न, सूर्यफूल आदी पिकांचे क्लस्टर करण्याच्या दृष्टीनेही चर्चा झाली.

जिल्हाधिकारी डुडी म्हणाले, की केळीची उत्पादकता प्रतिहेक्टरी ४२ वरून ६५ टनांपर्यंत वाढविण्यासाठी शेतीतील अत्याधुनिक तंत्रज्ञान, निविष्ठांचा योग्य वापर, अधिकाधिक क्षेत्र सेंद्रिय, नैसर्गिक शेतीखाली आणणे, पाण्याचा कार्यक्षम वापर, या पिकासाठीची सर्व टप्प्याची प्रमाणित कार्यपद्धती तयार करणे या बाबींवर विशेष भर द्यावा लागेल. विद्यापीठे आणि प्रगतशील केळी उत्पादक शेतकऱ्यांकडील तंत्रज्ञान अन्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे, या क्षेत्रातील शेतकरी उत्पादक कंपन्यांमार्फत निविष्ठा पुरवठा, ड्रोनसारखे अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवणे आदी कामे करावी लागतील.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी काचोळे म्हणाले, की केळी पिकाखाली इंदापूर, बारामती आणि जुन्नर तालुक्यांमध्ये १ हजार ६११ हेक्टर क्षेत्र असून ६७ हजार ६०० टन उत्पादन होते. आगामी पाच वर्षांत हे क्षेत्र ३ हजार हेक्टरवर आणि उत्पादन सुमारे २ लाख टनावर नेण्याचे उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने कृषी विभाग काम करत असून येत्या काळात त्यावर अधिक भर देण्यात येईल.

‘पणन मंडळाचा उपयोग करावा’
‘‘केळी उत्पादन वाढीसाठी तसेच वाढणाऱ्या उत्पादनावरील प्रक्रियेसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांना विविध योजनेतून अर्थसाह्य करणे, शीतसाखळी अंतर्गत साठवण गृहे उभारणी आणि बाजार जोडणीसाठी पणन मंडळ तसेच अन्य माध्यमांचा उपयोग करावा,’’ असे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी म्हणाले. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण आणि घाटमाथ्यावर पावसाचा इशारा; मराठवाड्यात हलक्या सरी शक्य

Maize Excellence Center: ‘मका उत्कृष्टता केंद्र’ स्थापनेच्या प्रस्तावावर चर्चा

Jayakwadi Dam Water Released: जायकवाडी धरणातून खेर्डा प्रकल्पात पाणी पोहोचले!

Modern Agricultural Machinery: ट्रॅक्टरचलित रोटरी खुरपणी यंत्र

Rice Farming: भात शेतीसाठी ‘एडब्ल्यूडी’ तंत्रज्ञान

SCROLL FOR NEXT