Kolhapur Irrigation Department agrowon
ॲग्रो विशेष

Kolhapur Irrigation Department : कोल्हापूर जिल्ह्यात शेतीसाठी उपसा करणाऱ्या पाच लघु पाटबंधारे तलावावर बंदी

Agriculture in Kolhapur : शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर उपसा बंदी करण्यात आली असल्याची माहिती पाटबंधारे विभागाने दिली.

sandeep Shirguppe

Agriculture in Kolhapur : पंचगंगा पाटबंधारे उपविभागांतर्गत करवीर तालुक्यातील कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगाव व दऱ्याचे वडगाव लघू पाटबंधारे तलाव येथील जलाशयातील पाण्यावर शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर उपसा बंदी करण्यात आली असल्याची माहिती पंचगंगा पाटबंधारे उपविभागाचे सहाय्यक अभियंता संदिप दावणे यांनी दिली.

यामध्ये कणेरीवाडी, राजाराम, उपवडे, कंदलगांव, दऱ्याचे वडगाव जलाशयातील पाण्यावर व डीपीवर ता. ०३ डिसेंबर पर्यंत, यानंतर ०८ डिसेंबर ते १७ डिसेंबर २०२३ व २२ डिसेंबर ते पुढील आदेशापर्यंत बंदी राहणार आहे. या कालावधीत शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर उपसा बंदी राहणार आहे.

याचबरोबर लघु पाटबंधारे तलाव व धरण पायथ्यापासून बोलोली बंधाऱ्यापर्यंत हरवळ नाल्यावर तसेच उपवडे जलाशयातून शेतीसाठी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर उपसा बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये उपवडे तलाव जलाशय, कणेरीवाडी तलाव जलाशय, कंदलगाव तलाव जलाशय, राजाराम तलाव जलाशय व दऱ्याचे वडगाव तलाव जलाशयातील उपसा बंदी ०३ डिसेंबर २०२३, ०८ डिसेंबर ते १७ डिसेंबर २०२३ व २२ डिसेंबर ते पुढील आदेशापर्यंत राहणार आहेत.

उपसाबंदी अंमलात आणावयाच्या कार्यक्षेत्रातील महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातील अधिकारी व क्षेत्रीय कर्मचारी यांनी नमुद केलेल्या उपवडे तलाव येथील जलाशयातील सर्व तीरावर नमुद केलेल्या कालावधीसाठी शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या विद्युत उपसायंत्राची तारामंडळे काढून घ्यावीत.

तसेच महसूल विभागातील अधिकारी कर्मचारी यांनी उपसा तेल येत्रांना सिल करावे व आदेशातील उपसा बंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी. उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास, संबंधित उपसायंत्र धारकाचा उपसा परवाना एक वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल असा आदेश काढण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orchard Water Management: पाण्याच्या उपलब्धतेनुसार अतिघन बागेचे नियोजन

Soybean Crop Management: सोयाबीनमधील फुलगळीची कारणे जाणून उपाययोजना आवश्‍यक

Maharashtra Drought: दुष्काळ जाहीर होणार, सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांची माहिती

Indian Oil Trade: कच्च्या तेलाची आयात; पॅकबंद तेलाची निर्यात

India US Trade: अमेरिकेपुढे झुकण्याची घोडचूक नको

SCROLL FOR NEXT