Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season 2023 : ‘बळीराजा’चे ७ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Sugarcane Crushing : मागील (२०२२-२३) गाळप हंगामातील एफआरपीनुसार बाकी ऊस देयक प्रतिटन ४६४ रुपये ७० पैसे नुसार एकूण २६ कोटी ५९ लाख रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकतीच वर्ग करण्यात आली आहे.

Team Agrowon

Parbhani News : मागील (२०२२-२३) गाळप हंगामातील एफआरपीनुसार बाकी ऊस देयक प्रतिटन ४६४ रुपये ७० पैसे नुसार एकूण २६ कोटी ५९ लाख रुपये एवढी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकतीच वर्ग करण्यात आली आहे.

यावर्षीच्या (२०२३-२४) हंगामात ७ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे अशी माहिती कान्हडखेड (ता.पूर्णा) येथील बळीराजा साखर कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी दिली.

बळीराजा साखर कारखान्याच्या १० व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदीपन शिवाजीराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत कारखान्याचे ज्येष्ठ संचालक दिनकरराव जाधव व त्यांच्या पत्नी वसुंधरा जाधव यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. २०) पार पडला.

यावेळी जाधव म्हणाले, गतवर्षी (२०२२-२३) च्या गाळप हंगामासाठी साखर कारखान्याने शासनाच्या एफआरपी प्रमाणे २७६४ रुपये ७० पैसे प्रति टन असा अंतिम भाव शेतकऱ्यांच्या उसाला देणार असल्याची जाहीर केले होते. त्यानुसार ऊस पुरवठा केलेल्या सर्व शेतकऱ्यांना कारखान्याने प्रतिटन २३०० रुपये अदा केले.

एफआरपीनुसार शिल्लक प्रतिटन ४६४ रुपये ७० पैसे प्रमाणे एकूण २६ कोटी ५९ लाख रुपये दसरा दिवाळीचा सण आनंदात साजरा करता यावा यासाठी शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकतेच वर्ग करण्यात आले असल्याचे ते म्हणाले.

कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष उत्तमराव कदम, संचालक दिनकरराव जाधव, सरव्यवस्थापक भगवान मोरे, वर्क्स मॅनेजर तुकाराम सुरवसे, किरण मगर, मुख्य शेतकी अधिकारी रमेश पौळ, नितीन गोणारकर, ऊस पुरवठा अधिकारी विनायक कराळे, रामजी शिंदे, विनायक कदम उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Subsidy: खोडवा उसातील पाचट शेतीसाठी खते, औषधांसाठी ५० टक्के अनुदान

Sesame Production: खानदेशात तीळ उत्पादन कमी

Farmer Participation: धोरणात्मक निर्णयात हवा शेतकऱ्यांचा सहभाग

National Education Policy 2020: कोणत्याही भाषेची जबरदस्ती नाही

Paddy Harvesting: भात कापणीसाठी यांत्रिकीकरणाकडे कल

SCROLL FOR NEXT