Sugarcane Season Agrowon
ॲग्रो विशेष

Sugarcane Season 2024 : ‘बळीराजा’चे सात लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट

Sugarcane Crushing Season : यंदाच्या (२०२४-२५) गळीत हंगामात बळिराजा कारखान्याने ७ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. सभासदांचा ऊस गाळप झाल्यानंतर उर्वरित बिगर सभासद शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी आणणार आहे.

Team Agrowon

Parbhani News : यंदाच्या (२०२४-२५) गळीत हंगामात बळिराजा कारखान्याने ७ लाख टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट आहे. सभासदांचा ऊस गाळप झाल्यानंतर उर्वरित बिगर सभासद शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी आणणार आहे. यंदा उसाला प्रतिटन ३००० रुपये दर राहील, असे प्रतिपादन कारखान्याचे अध्यक्ष शिवाजीराव जाधव यांनी केले.

बळीराजा साखर कारखान्याच्या ११ व्या गळीत हंगामाचा प्रारंभ बुधवारी (ता. १३) सायंकाळी ५ वाजता संपन्न झाला. यावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ संचालक दिनकरराव जाधव, वसुंधरा जाधव यांच्या बॉयलर अग्नी प्रदीपन करण्यात आले.

यावेळी डॉ. दत्तात्रेय वाघमारे, उत्तमराव कदम, लक्ष्मणराव बोबडे, चांदोजी बोबडे, एम. ए. सईद, गंगाधरराव धवन, बाबूराव बोबडे, जगदीश जोगदंड, हनुमंत डाके, आनंद अजमेरा, दिलीप माने, दौलत भोसले, नागेश नागठाणे, निवृत्ती सोलव, कृष्णा बोबडे, सरव्यवस्थापक भगवान मोरे, वर्क्स मॅनेजर तुकाराम सुरवसे, चीफ केमिस्ट किरण मगर, मुख्य शेतकी अधिकारी रमेश पौळ, इलेक्ट्रिक मॅनेजर नितीन गणोरकर, ऊस पुरवठा अधिकारी विनायक कऱ्हाळ, रामजी शिंदे, बाळासाहेब तिडके, सुरक्षा अधिकारी विनायक कदम, गणेश सूर्यवंशी, महेश हेबळे आदी उपस्थित होते.

जाधव म्हणाले, की कारखान्यांने २०२३-२४ मध्ये ६ लाख १२ हजार ६६३ टन उसाचे गाळप करून ७ लाख १५ हजार ८५० क्विंटल साखरेचे उत्पादन केले. सरासरी ११.८९ टक्के उताऱ्यानुसार निव्वळ देय एफआरपी प्रतिटन २ हजार ८०४.८४ रुपये अंतिम झाली आहे. ही सर्व रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली आहे.

साखर कारखान्याची ऊस तोडणी यंत्रणा, ऊस वाहतूक यंत्रणा, कुशल कर्मचारी वर्ग या गळीत हंगामासाठी तत्पर असून बळीराजा कारखान्यास जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपला ऊस देऊन कारखान्यास सहकार्य करावे. यावेळी कारखान्यातील विभाग प्रमुख, कर्मचारी, शेतकरी, ऊस तोड वाहतूक ठेकेदार, कामगार उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Marathwada Water Grid Project : मराठवाडा वॉटर ग्रीड योजना पुनरुज्जीवित करू

Soybean Procurement : पोर्टल बंद केल्याने रखडली सोयाबीन नोंदणी

Crop Insurance : विमा कंपनी प्रतिनिधीने पैशांची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी तक्रार करावी

Rabi Season 2024 : नांदेड जिल्ह्यात एक लाख हेक्टरवर रब्बी पेरणी

Maharashtra Election 2024 : ऊस उत्पादकांच्या मतांना निवडणुकीत आला भाव

SCROLL FOR NEXT