kisan sabha protest Agrowon
ॲग्रो विशेष

Adivasi Protest : किसान सभेचे आदिवासी विकास भवनात घुसून आंदोलन

Bal Hirada Procurement : बाळ हिरड्याच्या मागणीसाठी आदिवासी शेतकऱ्यांनी आज नाशिक येथील आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात घुसून निदर्शने करण्यात आली.

Swapnil Shinde

Nashik News : आदिवासी महामंडळाने​​​​​​ बाळ हिरड्याची तातडीने ​​​​​​​सरकारी खरेदी सुरू करावी, या प्रमुख मागणीसाठी ​​​​​​​​​​​​​​​​​​​​​किसान सभेचे धरणे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याच्या निषेधार्थ सोमवारी दुपारी संतप्त कार्यकर्त्यांनी व शेकडो आदिवासी शेतकऱ्यांनी नाशिक येथील आदिवासी विकास कार्यालयात घुसून निदर्शने केली.

किमान आधार भावाने सरकार प्रसंगी हिरडा खरेदी करावी, या मागणीसाठी किसान सभेच्या नेतृत्वाखाली मे महिन्यात अकोले ते लोणी पायी मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आदिवासी विकासमंत्री विजयकुमार गावित यांनी दरवर्षी इतर पिकांप्रमाणे हिरडा पिकाचेही किमान हमी भाव जाहीर केले जातील, असे आश्वासन दिले होते.

परंतु मंत्र्यांच्या आश्वासनानंतर पाच महिन्यांनंतरही आदिवासी महामंडळाकडून हिरड्याची खरेदी सुरू करण्यात आली नाही. त्याच्या निषेधार्थ किसान सभेच्या नेतृत्वाखाली नाशिक येथे आदिवासी शेतकऱ्यांनी धरणे आंदोलन सुरू होते. परंतु, प्रशासनाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने आज किसान सभेने आक्रमक भूमिका घेतली.

अजित नवले आणि डी एल कराड यांच्या नेतृत्वाखाली आदिवासी शेतकऱ्यांनी आदिवासी विकास भवनावर मोर्चा काढला. त्यानंतर कार्यालयात घुसून सरकारच्या धोरणाचा निषेध करण्यात आला. कार्यकर्ते आणि शेतकरी कार्यालयात घुसल्यानंतर कार्यालयामध्ये कर्मचाऱ्यांची धावपळ उडाली. यावेळी आंदोलकांकडून हिरडा व्यापाऱ्यांकडून होणारी लुट थांबवली जावी यासाठी हिरड्याची सरकारी खरेदी तातडीने सुरु करण्याची मागणी करण्यात आली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Disability Certificate Verification: दिव्यांग प्रमाणपत्राची टक्केवारी चाळीस टक्क्यांपेक्षा पेक्षा कमी

Summer Irrigation: उन्हाळी सिंचनातून हजारो हेक्टरला दिलासा

MLA Sanjay Puram: धान खरेदीचे उद्दिष्ट वाढविण्याची मागणी

Radhakrishna Vikhe Patil: नांदूर मध्यमेश्वरला शेती नापीक होण्याच्या प्रश्नावर करणार उपाय

Minor Irrigation Tax: पाटबंधारे विभागाने तातडीने ‘मायनर कर’ वसुली थांबवावी

SCROLL FOR NEXT