Bajari Agrowon
ॲग्रो विशेष

Bajari Sowing : बाजरी पेरणीला पुढील आठवड्यात सुरुवात

Rabi Bajari Crop : बाजरी अधिक थंडीत पेरू नये, असे शेतकरी म्हणतात. परंतु यंदा थंडी हवी तशी नाही. यामुळे शेतकरी आगाप पेरणी करण्याचे नियोजन करीत आहेत.

Team Agrowon

Jalgaon News : खानदेशात बाजरीच्या पेरणीला फारशी सुरुवात झालेली नाही. परंतु पुढील आठवड्यात आगाप पेरणीला सुरुवात होणार आहे. यंदा क्षेत्र स्थिर राहील, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बाजरी अधिक थंडीत पेरू नये, असे शेतकरी म्हणतात. परंतु यंदा थंडी हवी तशी नाही. यामुळे शेतकरी आगाप पेरणी करण्याचे नियोजन करीत आहेत. अनेकदा खानदेशात डिसेंबरच्या मध्यात पेरणी केली जाते. यंदाही पेरणी १५ डिसेंबरनंतर सुरू होईल, असे दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांनी यंदा कांदा, मका पिकाऐवजी बाजरी पेरणीचे नियोजन केले आहे.

काहींनी मका, कांद्याची लागवड कमी करून उर्वरित क्षेत्रात बाजरी पेरणीचे नियोजन केले आहे. यामुळे बाजरीच्या क्षेत्रात घट होणार नाही. यंदा सुमारे साडेसात ते आठ हजार हेक्टरवर बाजरीची पेरणी होईल. मागील हंगामात सुमारे साडेसात हजार हेक्टरवर बाजरी होती. जळगाव जिल्ह्यात तीन ते साडेतीन हजार हेक्टरवर पेरणी अपेक्षित आहे. धुळ्यातील शिरपूर, शिंदखेडा व साक्री हे तालुके बाजरीसाठी प्रसिद्ध आहेत.

जळगावमधील चाळीसगाव, पारोळा, अमळनेर, भडगाव, जामनेर. धरणगाव व चोपडा भागात बाजरीचे क्षेत्र अधिक असते. धुळ्यातील शिंदखेडा तालुका बाजरीसाठी प्रसिद्ध आहे. या भागात खरीप व रब्बीतही अनेक शेतकरी बाजरीची पेरणी करतात. सुमारे ९० ते १०० दिवसात बाजरीचे पीक येते.

उन्हाळ्यात काही भागांत जलसाठे कमी होतात. त्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच बाजरीचे पीक काढणी करून उत्पादन घरात आणण्याच्या दृष्टीने शेतकरी आगाप पेरणीचे नियोजन करीत आहेत. कारण उन्हाळ्यात पाण्याची समस्या तयार झाल्यास किंवा विजेची अडचण आल्यास पिकाची हानी होते. ही बाब लक्षात घेऊन अनेक शेतकरी लवकर किंवा आगाप पेरणी करीत आहेत. बाजरीला बाजारात २१०० रुपये प्रतिक्विंटलवर दर आहे. तसेच उठावही आहे. यामुळे शेतकऱ्यांनी बाजरीला पसंती दिली आहे.

काढणी पूर्ण झालेल्या केळी बागांतही पेरणी

अनेक शेतकऱ्यांनी कांदेबाग केळीची काढणी ९० टक्के झालेल्या बागेतही पेरणी करण्याचे नियोजन केले आहे. तापी, गिरणा, अनेर नदीच्या क्षेत्रात बेवडसाठी बाजरीची पेरणी शेतकरी करतात. बाजरी पिकाचे बेवड केळी किंवा पुढे कापूस पिकासाठी लाभदायी मानले जाते. बाजरीचा चाराही सकस असतो. त्याच्या चाऱ्यासही चांगला दर असतो. यामुळेदेखील काहींनी बाजरीची पेरणी केली आहे. एकरी १० ते १२ क्विंटल उत्पादन व आगाप येणाऱ्या वाणांच्या पेरणीला शेतकरी पसंती देत आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT