Rain Update Agrowon
ॲग्रो विशेष

Maharashtra Unseasonal Rain : नांदेडमध्ये शुक्रवारपर्यंत अवकाळीचा इशारा

Weather Update : मुंबई येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यात १७ ते २१ एप्रिल या पाच दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.

Team Agrowon

Nanded Weather News : मुंबई येथील प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यात १७ ते २१ एप्रिल या पाच दिवसांसाठी यलो अलर्ट जारी केला आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडत असल्याचे उन्हाळी शेतीपिकांसह भाजीपाला, फळबागेचे नुकसान होत आहे.

पाच दिवसांच्या काळात जिल्ह्यात तुरळक ठिकाणी ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. या वेळी विजांच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी काळजी घ्यावी असे, आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने केले आहे.

अवकाळीच्या काळात विजांच्या कडकडाटासह पावसाची पूर्वकल्पना असल्याने बाहेर जाणे टाळावे, आपण मोकळ्या जागेत असाल आणि जवळपास कुठल्याही सुरक्षित इमारतीचा आसरा नसेल तर सखल जागेत जाऊन गुडघ्यात डोके घालून बसावे.

आकाशात विजा चमकत असल्यास घरात किंवा सुरक्षित इमारतीत आश्रय घ्यावा, घराच्या बाल्कनी, छत अथवा घराबाहेरील ओट्यावर थांबू नये, घरात असताना आणि घरातील विद्युत उपकरणे चालू असतील तर त्या वस्तू त्वरित बंद करावे.

तारांचे कुंपण, विजेचे खांब व इतर लोखंडी वस्तूंपासून दूर रहावे. पाण्यात उभे असाल तर तत्काळ पाण्यातून बाहेर पडावे, यासोबतच आकाशात विजा चमकत असल्यास घरातील लँडलाईन फोनचा वापर करू नये.

शॉवरखाली अंघोळ करू नये, घरातील बेसिनचे नळ, पाण्याची पाईपलाईन यांना स्पर्श करू नये, तसेच कुठल्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये, असे आवाहन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT