Kharif Crop Agrowon
ॲग्रो विशेष

Kharif Paisewari : नांदेड जिल्ह्याची खरिपाची पैसेवारी सरासरी ५०.६२ पैसे

Kharif Season : जिल्ह्यातील खरीप हंगामाची हंगामी पैसेवारी शनिवारी (ता. ३०) जाहीर झाली. यात जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ५०.६२ पैसे जाहीर झाली.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यातील खरीप हंगामाची हंगामी पैसेवारी शनिवारी (ता. ३०) जाहीर झाली. यात जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ५०.६२ पैसे जाहीर झाली. यात सहा तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली, तर दहा तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशांवर जाहीर करून जिल्हा प्रशासनाने विभागीय आयुक्तांना कळविले आहे. यानंतर सुधारित तसेच अंतिम पैसेवारीनंतर पिकांची परिस्थिती लक्षात येईल.

जिल्हा प्रशासन दरवर्षी खरीप पिकांच्या परिस्थितीबाबत हंगामी, सुधारित व अंतिम पैसेवारी जाहीर करते. यातून पिकांच्या उत्पादकतेचा अंदाज येतो. जिल्ह्यात असलेल्या एक हजार ५६२ गावांत आठ लाख ७१ हजार ४०० हेक्टर क्षेत्र लागवडीखाली येते. यापैकी यंदा सात लाख ९८ हजार ५६८ हेक्टरवर खरिपात पेरणी झाली आहे.

या पेरणीक्षेत्रात पेरलेल्या पिकांच्या परिस्थितीचा अंदाज ता. ३० सप्टेंबर रोजी जाहीर झालेल्या हंगामी पैसेवारीवरून व्यक्त करण्यात आला होता. यात १० तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशापेक्षा अधिक, तर उर्वरित सहा तालुक्यांची पैसेवारी पन्नास पैशाच्या खाली जाहीर झाली आहे. तर जिल्ह्याची सरासरी पैसेवारी ५०.६२ पैसे असल्याचे कळविले आहे.

यानंतर सुधारित अंदाज ता. ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर होईल. १५ डिसेंबर रोजी अंतिम पैसेवारी जाहीर झाल्यानंतर पिकांची परिस्थिती लक्षात येईल. खरिपातील हंगामी पैसेवारी ३० सप्टेंबर रोजी करून जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी विभागीय आयुक्तांना कळविले आहे. यानंतर सुधारित तसेच अंतिम पैसेवारीनंतर कृषी, महसूल व ग्रामविकास यंत्रणेच्या सयुक्तिक पद्धतीने घेण्यात येणाऱ्या‍ पीक कापणी प्रयोगाच्या उत्पादकतेकडे शेतकऱ्‍यांचे लक्ष असेल.

तालुकानिहाय जाहीर झालेली अंतिम पैसेवारी (कंसात गावांची संख्या) नांदेड ५२ (८८), अर्धापूर ५२ (६४), कंधार ४८ (१२६), लोहा ४६ (१२७), भोकर ५५ (७७), मुदखेड ५३ (५५), हदगाव ५१ (१३७), हिमायतनगर ४८ (६४), किनवट ५३ (१९१), माहूर ५३ (९२), देगलूर ५१ (१०८), मुखेड ४६ (१३५), बिलोली ४७ (९१), नायगाव ४७ (८९), धर्माबाद ५२ (५६), उमरी ५६ (६२). (नांदेड तालुक्यातील १३ गावांचे नागरीकरण झाले आहे.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2026 : देशात कापूस, सोयाबीन, ऊस, भात लागवड पिछाडीवर; भरडधान्य, तूर, मक्याची आघाडी

Farm Loan Waiver: कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी तयारी सुरु

Khoya Production Mechanization: खवा उत्पादनातील यांत्रिकीकरण

Desi Poultry Farming: अल्पभूधारक माळींना ठरला देशी कोंबडीपालनाचा आधार

Dairy Farming Success: शेतीपेक्षा दुग्ध व्यवसायातून मिळवले आर्थिक स्थैर्य

SCROLL FOR NEXT