Fruit Crop Insurance  Agrowon
ॲग्रो विशेष

Fruit Crop Insurance : हवामान आधारित फळपीक विमा योजनेचा लाभ घ्या

Crop Insurance : शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण देऊन त्यांचे आर्थिक स्थैर्य अबधित राखण्यासाठी राज्यामध्ये हवामान आधारित फळपीक विमा राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

Team Agrowon

Satara News : शेतकऱ्यांच्या फळपिकांना हवामान धोक्यांपासून विमा संरक्षण देऊन त्यांचे आर्थिक स्थैर्य अबधित राखण्यासाठी राज्यामध्ये हवामान आधारित फळपीक विमा राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्ह्यातील २०२४ -२५ मधील मृग बहरातील डाळिंब, पेरू व सीताफळ या पिकांचा सामावेश करण्यात आला आहे.

या योजनेत काही बदल केले आहेत. ही योजना आता कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांना ऐच्छिक करण्यात आली आहे. तरी विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे.

या योजनेत शेतकऱ्यांनी फक्त ५ टक्के रक्कम भरावयाची असून, उर्वरित विमा हप्ता रक्कम शासन भरणार आहे. त्यामुळे विमा हप्त्याची रक्कम अल्प असून, ती प्रति हेक्टरी पुढीलप्रमाणे : पीक- डाळिंब, बहर- मृग, सहभागाची मुदत १४ जुलै, हेक्टरी विमा संरक्षित रक्कम एक लाख ६० हजार, शेतकरी हिस्सा आठ हजार व शासन हिस्सा सहा हजार ४०० रुपये आहे.

पेरू या पिकासाठी बहार- मृग, सहभागाची मुदत, २५ जून हेक्टरी विमा संरक्षित रक्कम ७० हजार, शेतकरी हिस्सा तीन हजार ५०० रुपये, शासन हिस्सा तीन हजार ५०० रुपये. सीताफळ या पिकासाठी मृग बहर सहभागाची मुदत ३१ जुलै हेक्टरी विमा संरक्षित रक्कम ७० हजार, शेतकरी हिस्सा तीन हजार ५०० रुपये व शासन हिस्सा नऊ हजार १०० रुपये आहे.

अधिसूचित फळपिके पुढिलप्रमाणे ः

डाळिंब पिकासाठी मृग बहर कोरेगाव तालुक्यात वाठार स्टेशन, खंडाळा तालुक्यात खंडाळा, लोणंद, शिरवळ, खटाव तालुक्यातील खटाव, वडूज, पुसेगाव, औंध, पुसेसावळी, मायणी, कातरखटाव, बुध निमसोड, कलेढोण. फलटण तालुक्यातील फलटण, राजाळे, आसू, गिरवी, बरड, आदर्की बु. तरडगाव, होळ, वाठार निं, कोळकी. माण तालुक्यातील दहिवडी, मलवडी, मार्डी, गोंदवले बु. म्हसवड, कुकुडवाड, शिंगणापूर , वर, मलवडी, आंधळी ही गावे आहेत.

सीताफळ व पेरू या पिकांसाठी फलटण तालुक्यातील गिरवी, बरड, कोळकी. खंडाळा तालुक्यातील खंडाळा, लोणंद, शिरवळ, वाठार बु. ही गावे आहेत. शेतकऱ्यांना ज्या शेतातील अधिसुचित फळपीकाचा विमा उतरावयचा आहे. त्या शेताचा सातबारा उतारा व आठ अ चा खाते उतारा तसेच आपले ज्या राष्ट्रीयीकृत किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेत खाते आहे, त्या ठिकाणी विमा हप्ता भरावयाचा आहे.

सार्वजनिक सुविधा केंद्रांमार्फत व विमा कंपनीच्या संकेत स्थळावरून ही विमा हप्ता भरता येईल. सातबारा उतारा प्राप्त होत नसल्यास अधिसूचित पीक असल्याचे स्वयंघेाषणा पत्र जोडणे आवश्यक आहे. योजनेत सहभागी होण्यासाठी आवश्यक विहीत नमुण्यातील अर्ज बँकेकडे व विमा कंपनीकडे उपलब्ध असून आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

Turmeric Cultivation: जळकोट तालुक्यात शेतकऱ्यांची हळद लागवडीची लगबग

Agriculture Awards: नांदेडमधील चार शेतकऱ्यांना राज्यस्तरीय कृषी पुरस्कार जाहीर

Wildlife Management: जाळी लावून रोखला वन्यप्राण्यांचा उपद्रव

Smart Electricity Meter : वादातही सोलापूर मंडळात ४.१७ लाख स्मार्ट मीटर

SCROLL FOR NEXT