Lakhimpur Kheri Agrowon
ॲग्रो विशेष

हिंसाचार प्रकरणातील साक्षीदार दिलबाग सिंह यांच्यावर हल्ला

लखीमपूर खेरी प्रकरण

टीम ॲग्रोवन

लखीमपूर खेरी : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे ऑक्टोबर २०२१ मध्ये झालेल्या हिंसाचार प्रकरणातील साक्षीदार भारतीय किसान युनियन (बीकेयू) चे लखीमपूर खेरीचे जिल्हाध्यक्ष दिलबाग सिंह यांच्यावर लखीमपूर खेरी येथे दोन अज्ञात व्यक्तींनी हल्ला केला, असे पोलिसांनी बुधवारी (ता. १) सांगितले.

आता रद्द झालेल्या कृषी कायद्यांच्या विरोधात निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे नेतृत्व दिलबाग सिंह यांनी केले होते. पोलिसांनी सांगितले की, मंगळवारी रात्री जिल्हाध्यक्ष दिलबाग सिंह गोला कोतवाली भागातील अलीगंज-मुडा रस्त्यावरून आपल्या एसयूव्हीमधून घरी परतत असताना दुचाकीवरून आलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांची एसयूव्ही आडवून त्यांच्यावर गोळीबार केला. ३ ऑक्टोबर २०२१ मध्ये टिकुनिया हिंसाचारात सिंह साक्षीदार आहेत. या आंदोलनात चार शेतकरी आणि एका पत्रकारासह आठ लोकांचा मृत्यू झाला होता.

याप्रकरणी केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्रा याला प्रामुख आरोपी म्हणून अटक करण्यात आली आहे. पीटीआयशी फोनवर बोलताना सिंह यांनी सांगितले की, हल्लेखोरांनी त्याच्या एसयूव्हीचा टायर पंक्चर केला ज्यामुळे त्यांना वाहन थांबवावे लागले. हल्लेखोरांनी एसयूव्हीचे दरवाजे आणि खिडक्या उघडण्याचा प्रयत्न केला. त्यात अयशस्वी झाल्यावर त्यांनी ड्रायव्हरच्या बाजूच्या खिडकीच्या चौकटीवर दोन गोळ्या झाडल्या. सिंह एसयूव्ही चालवत होते आणि ते एकटेच होते. हल्लेखोरांचा हेतू लक्षात आल्याने त्यांनी ड्रायव्हर सीट दुमडली आणि जमिनीच्या दिशेने वाकले. वाहनाच्या खिडक्या गडद फिल्मने झाकल्या गेल्याने, हल्लेखोर एसयूव्हीमधील त्यांची स्थिती ठरवू शकले नाहीत आणि गोळीबारानंतर त्यांच्या दुचाकीवरून पळून गेले. त्यांनी सांगितले की त्यांनी बीकेयूचे प्रवक्ते राकेश टिकैत यांनाही या घटनेची माहिती दिली होती. अतिरिक्त पोलिस अधीक्षक अरुण कुमार सिंह यांनी पीटीआयला सांगितले की, दिलबाग सिंह यांच्या तक्रारीवरून एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT