Crop Insurance Company Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Insurance Company : विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण

Deprived of Crop Insurance : पीकविमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काही शेतकऱ्यांकडून लाभ देण्यासाठी पैसे उकळले असा आरोप आहे.

Team Agrowon

Yavatmal News : पैसे घेऊन विमा भरपाई दिली जात असल्यासोबतच काही जणांना हेतुपुरस्सर भरपाईपासून वंचित ठेवल्याचा आरोप करीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी विमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना चोप दिला. राळेगाव तालुका कृषी अधिकारी कार्यालयातच हा प्रकार घडला.

अतिवृष्टीमुळे राळेगाव तालुक्‍यात पिकांचे मोठे नुकसान झाले. या परिस्थितीत पीकविमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी काही शेतकऱ्यांकडून लाभ देण्यासाठी पैसे उकळले असा आरोप आहे. ज्या शेतकऱ्यांनी पैसे दिले नाही त्यांना भरपाईसाठी वंचित ठेवले.

मनसे पदाधिकाऱ्यांनी पीकविमा कधी मिळणार, गावात पीकविमा कंपनीचे प्रतिनिधी येऊन शेतकऱ्यांकडून हजार-दोन हजार रुपये घेऊन विमा जमा करतात, असे म्हणत शंकर वरघट यांनी कंपनीच्या प्रतिनिधीला विचारणा केली.

त्यानंतर वादात वीमा कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण करण्यात आली. या वेळी सूरज लेणमुरे, स्वप्नील नेहारे, सचिन आत्राम, ऋषिकेश मिर्झापुरे, गोपाळ मांदाडे, रोशन गुरनुले, नीलेश बुटे, गणेश मांदाडे यांच्यासह मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Orange Fruit Drop: शुक्लकाष्ठ फळगळीचे!

Pimpalapur Farmer Death Assistance: पिंपळापूर येथील आत्महत्याग्रस्त कुटुंबाची प्रशासनाकडून भेट; शासकीय योजनांचा लाभ देण्याची कार्यवाही

New Gram Panchayat Schemes: ग्रामपंचायतींसाठी पाच नव्या योजनांना मंजुरी

Cibil Score Issue: कर्जमुक्ती योजनेमुळे सिबिल स्कोअरवर परिणाम : तुपकर

Farmer Protest Warning: ‘डीबीटी’साठी शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा

SCROLL FOR NEXT