Ashok Kirnalli Agrowon
ॲग्रो विशेष

Horticulture Director: फलोत्पादन संचालकपदाची सूत्रे अशोक किरनळ्ळी यांच्याकडे

Ashok Kirnalli: राज्याचे फलोत्पादन संचालक डॉ. कैलास मोते ३१ मे रोजी निवृत्त होत आहेत. त्यांच्या निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर कृषी आयुक्तांनी अशोक किरनळ्ळी यांना संचालक पदाचा तात्पुरता पदभार दिला आहे.

मनोज कापडे

Pune News: राज्याच्या फलोत्पादन संचालकपदाचा तात्पुरता पदभार अशोक किरनळ्ळी यांच्याकडे देण्यात आला आहे. फलोत्पादन संचालकपदावरून डॉ. कैलास मोते शनिवारी (ता. ३१) निवृत्त होत आहेत. त्यामुळे कृषी आयुक्तांनी श्री. किरनळ्ळी यांना अतिरिक्त पदभार देण्याचा निर्णय घेतला.

श्री. किरनळ्ळी सध्या ‘आत्मा’ विभागाचे संचालक आहेत. त्यांच्याकडे फलोत्पादन संचालकाबरोबरच महाराष्ट्र राज्य फलोत्पादन आणि औषधी वनस्पती मंडळाचे संचालकपददेखील तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आले आहे. कृषी संचालकपदासाठी सध्या कृषी खात्यात एकाही अधिकाऱ्याकडे सेवाज्येष्ठता नाही.

त्यामुळे पूर्णवेळ नियुक्ती होणार नसल्याच सूत्रांचे म्हणणे आहे.फलोत्पादन विभागाकडे शेकडो कोटी रुपयांच्या योजना असून विशेषतः सूक्ष्म सिंचन योजना विशेष चर्चेत असते. त्यामुळे ‘गुणनियंत्रण’नंतर राज्यात सर्वांत महत्त्वाचा विभाग म्हणून ‘फलोत्पादन’चा उल्लेख होतो. डॉ. मोते पूर्वी मृदसंधारण संचालकपद सांभाळत होते.

ज्येष्ठतेच्या बळावर त्यांनी गुणनियंत्रण संचालकपदावर दावा सांगितला होता. परंतु, गुणनियंत्रण संचालकपदाच्या शर्यतीत सुनील बोरकर यशस्वी ठरले. गुणनियंत्रण विभाग मिळत नसल्याचे लक्षात येताच डॉ. मोते यांनी नाईलाजाने फलोत्पादन विभाग स्वीकारला होता. विशेष म्हणजे फलोत्पादन विभागाची सूत्रे स्वीकारल्यानंतरदेखील डॉ. मोते यांनी ‘गुणनियंत्रण’साठी पाठपुरावा सुरूच ठेवला.

मात्र, श्री. बोरकर यांना डावलून गुणनियंत्रण संचालकपद इतर अधिकाऱ्याला देण्याचे प्रयत्न हाणून पाडल्याचे बोलले जाते. एका बड्या राजकीय नेत्याने हस्तक्षेप केल्यामुळे डॉ. मोते यांना अखेरपर्यंत ‘गुणनियंत्रण’मध्ये शिरकाव मिळाला नाही, असे काही अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fake Agriculture Input: बनावट निविष्ठांचे जाळे राज्यांच्या सीमापार

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवरील आंदोलन आणि सप्तपर्णीची अ‍ॅलर्जी

Fake Pesticide Issue: बनावट कीडनाशके : हवी सक्षम यंत्रणा

Tissue Culture Lab Scheme: उती संवर्धन प्रयोगशाळेसाठी अर्जाची संधी

Agriculture Services Reform: कृषी विभागाच्या अकरा सेवांचे डिजिटल सुसूत्रीकरण

SCROLL FOR NEXT