Farmers Protest  Agrowon
ॲग्रो विशेष

Land Acquisition : जमीन अधिग्रहण प्रश्न रेंगाळल्याने शेतकऱ्यांनी केला ‘रास्ता रोको’

Land Compensation : विंचूर-प्रकाशा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, भावडबारी घाट ते रामेश्वरदरम्यान आठ किलोमीटर एकेरी काम पूर्ण झाले असून, दुहेरी मार्गाचे निम्मे काम झाले आहे.

Team Agrowon

Nashik News : तालुक्यातील भावडबारी घाट ते रामेश्वर फाटा या राष्ट्रीय महामार्गाच्या कामास तीन दिवसांपूर्वीच पोलीस बंदोबस्तात सुरुवात झाली. मात्र, शुक्रवारी (ता. १६) शेतकऱ्यांनी ‘रास्ता रोको’ करीत काम बंद पाडले.

या दरम्यान शिवसेनेचे संपर्कप्रमुख भाऊसाहेब चौधरी यांनी पालकमंत्री व जिल्हाधिकाऱ्यांबरोबर दोन दिवसांत एकत्रित बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिल्याने शेतकऱ्यांनी आंदोलन मागे घेतले. मात्र, मार्ग निघेपर्यंत काम बंद ठेवण्याबद्दल ठेकेदार व अधिकाऱ्यांना सांगण्यात आले.

विंचूर-प्रकाशा या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू असून, भावडबारी घाट ते रामेश्वरदरम्यान आठ किलोमीटर एकेरी काम पूर्ण झाले असून, दुहेरी मार्गाचे निम्मे काम झाले आहे. सहा महिन्यांपासून राष्ट्रीय महामार्गालगतच्या शेतकऱ्यांनी आमच्या जमिनी मोजून द्याव्यात व त्यातील किती जमिनीचे अधिग्रहण होणार आहे याबाबत संभ्रम असल्याने संबंधित ठेकेदार व राष्ट्रीय महामार्गाचे अधिकारी यांत वारंवार वाद होऊन काम बंद ठेवण्यात येत आहे.

एकेरी वाहतूक करताना बाजूच्या अपूर्ण कामांवर सुमारे तीन फुटांची खोली असल्याने वाहनधारकांना या आठ किलोमीटरचा प्रवास जीव मुठीत बालून करावा लागतो. असे असले तरी शेतकऱ्यांना जमिनीच्या मोबदल्याबाबत अद्याप स्पष्टता होत नसल्याने सहा महिन्यांपासून काम बंद केले होते. मात्र, दोन ते तीन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग व संबंधित ठेकेदार यांनी बंदोबस्तात हे काम सुरू केले. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये उद्रेक होऊन काम बंद पाडले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT