Garlic Rate Agrowon
ॲग्रो विशेष

Garlic Rate : लसणाची आवक घटल्याने दर तेजीतच

Garlic Market : सोलापूर बाजार समितीत कांद्याप्रमाणाचे लसणाचीही मोठी आहे. प्रत्येक आठवड्याला चार ट्रकमधून १२०० पोते लसणाची आवक होत असते.

Team Agrowon

Solapur News : सोलापूर श्री सिद्धेश्वर कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाची आवक कमी झाल्याने दर वाढत आहेत. त्यामुळे एका आठवड्यात एका किलोमागे ३० ते ४० रुपयांची वाढ झाली आहे. सध्यास लसणाचे दर प्रतिकिलो ३०० रुपयांच्यावर पोचले आहेत.

सोलापूर बाजार समितीत कांद्याप्रमाणाचे लसणाचीही मोठी आहे. प्रत्येक आठवड्याला चार ट्रकमधून १२०० पोते लसणाची आवक होत असते. परंतु मागील ३ महिन्यांपासून लसणाची आवक कमी झाली आहे.

बाजार समितीत आठवड्यातून एकदा २ ट्रकमधून ६०० पोत्यांतून लसणाची आवक होत असल्याचे लसूण विभाग प्रमुखांनी सांगितले. किरकोळ बाजारात सरासरी ३०० ते ३५० रुपये किलोने लसणाची विक्री होत आहे.

यावर्षी उत्पादन कमी असल्याने नव्या लसणाची मागणी वाढली आहे. मागील आठवड्यात सरासरी २०० रुपये किलो तर उच्च प्रतिचा लसूण २५० रुपये किलोने विकला जात होता. मागणी वाढल्याने उच्च प्रतिच्या लसणाचे दर ३४० रुपयांवर पोचले आहेत.

सरासरी दर २७० रुपये आहेत. लसणाचे सर्वाधिक उत्पादन होणाऱ्या मध्य प्रदेश व राजस्थान येथे अतिपावसामुळे उत्पादन कमी झाल्याने त्याचा परिणाम थेट दरांवर झाला आहे. उत्पादन कमी असल्याने दर वाढले आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Sowing 2026 : देशात कापूस, सोयाबीन, ऊस, भात लागवड पिछाडीवर; भरडधान्य, तूर, मक्याची आघाडी

Farm Loan Waiver: कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित करण्यासाठी तयारी सुरु

Khoya Production Mechanization: खवा उत्पादनातील यांत्रिकीकरण

Desi Poultry Farming: अल्पभूधारक माळींना ठरला देशी कोंबडीपालनाचा आधार

Dairy Farming Success: शेतीपेक्षा दुग्ध व्यवसायातून मिळवले आर्थिक स्थैर्य

SCROLL FOR NEXT