Takari Irigation Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Irrigation : ‘ताकारी’चे पंप बंद केल्याने कालव्यांचा प्रवाह संथ

Takari Irrigation Scheme : सांगलीजवळ कृष्णेचे पात्र कोरडे पडल्याने ताकारीचे ४ पंप बंद करून पाणी १ फेब्रुवारी रोजी सांगलीकडे कृष्णा नदीत सोडण्यात आले.

Team Agrowon

Sangli News : सांगलीजवळ कृष्णेचे पात्र कोरडे पडल्याने ताकारीचे ४ पंप बंद करून पाणी १ फेब्रुवारी रोजी सांगलीकडे कृष्णा नदीत सोडण्यात आले. मुख्य कालव्याचा प्रवाह मंद झाल्याने लाभक्षेत्रातील शेतकरी धास्तावले आहेत.

ताकारीच्या पाच पंपांचे पाणी तिसऱ्या टप्प्यातून सोनहिरा खोऱ्यात कायम सुरू ठेवले आहे. मुख्य कालव्याचे पाणी बंद झाल्याने अवलंबून असणारे शेतकरी चिंताग्रस्त आहेत. ताकारी लाभक्षेत्रातील मागणी विचारात घेऊन पाटबंधारे विभागाने ताकारी योजनेचे यावर्षीचे तिसरे व रब्बी हंगामातील दुसरे आवर्तन २२ जानेवारी रोजी रात्री सुरू केले.

पाण्याचा लाभ योजनेच्या १८ हजार हेक्टर क्षेत्राला होणार आहे. आवर्तन सुरू झाल्याने शेतकऱ्यांतून समाधान व्यक्त होत आहे. परंतु सांगलीत टंचाई जाणवू लागल्याने व कृष्णा पात्र कोरडे पडल्याने ताकारी, टेंभू योजनेचे निम्मे पंप बंद करण्याचे निर्देश देण्यात आलेत. नदीकाठच्या गावांना पिण्याच्या पाण्यासाठी ताकारीचे सुरू असणारे ९ पैकी ४ पंप बंद करून पाणी नदीत सोडले गेले.

ताकारीचे सुरू असणाऱ्या उर्वरित ५ पंपांचे पाणी तिसऱ्या टप्प्यातून सोनहिरा खोऱ्यात सुरू आहे. मुख्य कालवा आटला आहे. १० दिवसांत मुख्य कालव्याचे पाणी बंद झाल्याने शेतकऱ्यांतून चिंतेचा सूर उमटत आहे.

ताकारीच्या वाट्याचे यावर्षीचे ३.६ टीएमसी पाणी अद्याप उचलणे बाकी आहे. चालू आवर्तन ३० ते ३५ दिवस देण्याचे नियोजन आहे. ताकारी योजना सक्षमपणे कार्यरत असून आवर्तनही वेळेत मिळत आहे.

सोडलेले पाणी मुख्य कालव्यातून १४४ किमीवर (सोनी, ता. मिरज) वर पोहोचवले जाणार आहे. सध्या कृष्णा नदीकाठावर टंचाई जाणवत असल्याने तत्काळ पाणी सोडण्याचे आदेश आहेत. दोन दिवसांत पुनश्चः ताकारी योजना पूर्ण क्षमतेने सुरू होणार आहे. सर्व पोटकालव्यांना पुरेसे पाणी दिले जाणार आहे. शेतकऱ्यांनी गडबड करू नये.
- राजन डवरी, कार्यकारी अभियंता, ताकारी योजना

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT