V. Radha Agrowon
ॲग्रो विशेष

Principal Secretary : ‘कृषी’च्या प्रधान सचिवपदी व्ही. राधा

Appointed in Agriculture Department : निती आयोगात प्रतिनियुक्तीवर असलेल्या वरिष्ठ सनदी अधिकारी व्ही. राधा यांची कृषी विभागाच्या प्रधान सचिवपदी मंगळवारी नियुक्ती करण्यात आली.

Team Agrowon

Mumbai News : निती आयोगात प्रतिनियुक्तीवर असलेल्या वरिष्ठ सनदी अधिकारी व्ही. राधा यांची कृषी विभागाच्या प्रधान सचिवपदी मंगळवारी नियुक्ती करण्यात आली. दुसरीकडे कृषी आयुक्तपदी रवींद्र बिनवडे यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.

श्री. बिनवडे सध्या पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यरत आहेत. दरम्यान, पशुसंवर्धन व दुग्धविकास विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांची असंघटित कामगार आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

‘ॲग्रोवन’मधून या विषयावर वारंवार आवाज उठविला होता. अखेर व्ही. राधा यांची सरकारने नियुक्ती केली आहे. त्या याआधी २०१८ मध्ये नाशिक महापालिकेच्या आयुक्त राहिल्या आहेत. त्यानंतर प्रतिनियुक्तीवर केंद्र सरकारमध्ये गेल्यानंतर सध्या नीती आयोगात अतिरिक्त सचिव पदावर त्या कार्यरत होत्या.

यशदाच्या अतिरिक्त महासंचालकपदी रणजित कुमार, वस्तू व सेवा कर सहआयुक्त म्हणून नीमा अरोरा, महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्स्फॉर्मेशनच्या (मित्र) सहमुख्य कार्यकारी अधिकारीपदी अमन मित्तल, राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या आयुक्त व संचालकपदी ए. एस. नायक आणि ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रोहन घुगे यांची बदली करण्यात आली.

‘‘मुंढे यांचे आताच्या आणि या आधीच्याही लोकप्रतिनिधींशी जुळले नाही. त्यांची एकदा चीन किंवा अमेरिकेला बदली करावी म्हणजे वारंवार बदली होणार नाही,’’ असा टोला विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी लगावला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Subsidy: शेतकरी अनुदानासाठीचे  ४८ लाख अर्ज पडून

Agriculture Department Scam: आवटे समितीच्या अहवालात दोन अधिकाऱ्यांवर ठपका

Jaggery Price: श्रावणामुळे गुजरातमध्ये गुळाच्या मागणीत वाढ

Maharashtra Heavy Rain: घाटमाथ्यावर पावसाचा जोर

Maharashtra Rain: कोकण, घाटमाथा, विदर्भात जोरदार सरी शक्य

SCROLL FOR NEXT