Navardev B.Sc. Agri Agrowon
ॲग्रो विशेष

Navardev B.Sc. Agri : ‘नवरदेव बीएस्सी ॲग्री’च्या कलावंतांची ‘ॲग्रोवन’ला भेट

Marathi Movie Promotion : आर्यन एज्युटेंटमेंट प्रस्तुत मिलिंद लडगे निर्मित या चित्रपटाचे राम खाटमोडे व विनोद वणवे हे दिग्दर्शक, लेखक आहेत.

Team Agrowon

Pune News : शेतकरीपुत्राच्या लग्नाची समस्या रंगतदार कथा आणि सकस अभिनयाच्या माध्यमातून प्रभावीपणाने मांडणाऱ्या ‘नवरदेव बीएस्सी ॲग्री’ या चित्रपटाच्या कलावंत आणि निर्मिती चमूने ‘सकाळ ॲग्रोवन’ कार्यालयाला गुरुवारी सदिच्छा भेट दिली व ‘ॲग्रोवन’च्या सहकाऱ्यांशी संवाद साधला. ‘ॲग्रोवन’ या चित्रपटाचा माध्यम प्रायोजक आहे.

आर्यन एज्युटेंटमेंट प्रस्तुत मिलिंद लडगे निर्मित या चित्रपटाचे राम खाटमोडे व विनोद वणवे हे दिग्दर्शक, लेखक आहेत. चित्रपटात अभिनेते मकरंद अनासपुरे, प्रवीण तरडे, क्षितीश दाते, रमेश परदेशी, प्रियदर्शनी इंदलकर यांच्या मुख्य भूमिका आहेत. शेतकऱ्याला अन्नदाता म्हटले जात असले तरी शेतीमधून त्याची आर्थिक भरभराट होत नाही.

शेतीचं उत्तम शिक्षण घेतलेल्या महत्त्वाकांक्षी तरूणांना लग्नासाठी कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते याची कथा या चित्रपटात पाहायला मिळणार आहे. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेले या चित्रपटातील ‘भेटणार कधी नवरदेवा नवरी’ हे गाणं तसेच ‘लाल चिखल’ हे रॅपसाँग प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले आहे. येत्या २६ जानेवारीला राज्यभर झळकणारा हा चित्रपट प्रत्येकाने कुटुंबासह पाहावा, असे आवाहन सर्व कलावंतांनी केले.

‘ॲग्रोवन’चे संपादक संचालक आदिनाथ चव्हाण यांनी चित्रपट कलावंतांचे स्वागत केले. या वेळी सहायक सरव्यवस्थापक (वितरण) संभाजी घोरपडे, सकाळचे वरिष्ठ व्यवस्थापक (वितरण) संतोष कुडले उपस्थित होते. ‘शेतकऱ्यांच्या सामाजिक व्यथेची रंजक पद्धतीने मांडणी करणारा हा चित्रपट ग्रामीण व शहरी प्रेक्षकांनाही आपलासा वाटेल,’ अशा शुभेच्छा श्री. चव्हाण यांनी दिल्या.

शेतकऱ्याला हवा सन्मान

अभिनेते मकरंद अनासपुरे म्हणाले की, बाजारात टिकल्यांचे पाकिट विकणारा स्वतःला बिझनेसमन म्हणवून घेतो; परंतु, एका दाण्याचे हजार दाणे करणाऱ्या अन्नदात्या शेतकऱ्याला व्यावसायिक म्हणून का मान्यता दिली जात नाही, असा सवाल या चित्रपटातील एका दृश्यात मी उपस्थित केला आहे. शेतीवर सतत कोपणारा निसर्ग, शेतकऱ्याचे ढासळणारे सामाजिक स्थान आणि त्यातून उद्भवणाऱ्या दाहक समस्या या चित्रपटाने रंजकपणे प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT