Water For Wildlife  Agrowon
ॲग्रो विशेष

Water Resources : उन्हाळ्यात वन्यप्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठ्यांचा आधार

Water For Wildlife : उन्हाळ्याचे दिवस सुरू असले तरी वन्यप्राण्यांचा पाण्यासाठी संघर्ष सुरु झाला आहे. जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटल्यामुळे पाण्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या वन्‍य जीवांसाठी कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत.

Team Agrowon

Manmad News : उन्हाळ्याचे दिवस सुरू असले तरी वन्यप्राण्यांचा पाण्यासाठी संघर्ष सुरु झाला आहे. जंगलातील नैसर्गिक जलस्रोत आटल्यामुळे पाण्याच्या शोधात भटकंती करणाऱ्या वन्‍य जीवांसाठी कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. सर्वत्र पाणी अटल्यामुळे आता या कृत्रिम पाणवठ्यामध्ये पाणी सोडण्याचे काम सुरू आहे.

वन विभागाने जंगलातील विविध ठिकाणी ७ कृत्रिम पाणवठे तयार केले आहेत. या पाणवठ्यांमध्ये पाणी साठवण्यासाठी टाक्या, जलाशय आणि जलसंचय क्षेत्र तयार केली आहेत, ज्यामुळे वन्यप्राण्यांना पाणी सहज मिळू शकते.

प्रत्येक पाणवठ्याची क्षमता पाण्याच्या गरजेनुसार केली असून पाणी लवकर संपणार नाही. याची काळजी घेतली आहे. या पाणवठ्यांमुळे वन्यप्राणी दूरवर पाणी शोधण्यासाठी न जाता या पाणवठ्याचा उपयोग ते करतात.

नैसर्गिक जलस्रोत कमी झाल्यामुळे सध्या वन्यजीवांना पाणी शोधताना अडचणींचा सामना करवा लागतो. परंतु वन विभागाने पाणी उपलब्ध करून दिल्यामुळे प्राण्यांची सोय झाली आहे. वन्यप्राण्यांना हे पाणवठे उपयुक्त असून मोठ्या प्राण्यांसाठी खोल तसेच छोटे प्राणी आणि पक्ष्यांसाठी उथळ पाण्याची व्यवस्था त्यात करण्यात आली आहे.

पाण्याच्या शोधासाठी वन्यजीव जंगलाच्या बाहेर आणि मानववस्तीच्या जवळ जात असल्याने त्यांच्या जिवाला धोकाही निर्माण होतो. परंतु हे पाणवठे तयार केल्यामुळे माणूस आणि वन्यजीव यांच्यातला संघर्ष कमी होण्यास मदत झाली आहे.

असलेल्या कातरवाडी वनविभागात कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्याने वन्यप्राण्यांना पाणी शोधण्यासाठी करावा लागणारा संघर्ष कमी होणार आहे. आज टँकरद्वारे पाणी टाकले. 

पाण्याच्या या सोयीमुळे वन्यप्राणी पाणी शोधण्यासाठी दूर जाण्याऐवजी या पाणवठ्यांवर सहजपणे पाणी मिळू शकणार आहे. उन्हाळ्यात पाणी शोधण्याचे वाढते संकट लक्षात घेता, कृत्रिम पाणवठ्यात टँकरद्वारे पाणी टाकणे वनविभागाचे हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

Ujani Dam Water : उजनी धरणाचे आज रात्री सोळा दरवाजे उघडणार

Water Stock : सातपुड्यातील प्रकल्पांत जलसाठा वाढला

Agriculture Damage : कालवे वाहते राहिल्याने जमीन नापीक

SCROLL FOR NEXT