Mango Market Agrowon
ॲग्रो विशेष

Mango Market : पुण्यात रत्नागिरी हापूसच्या दोन हजार पेट्यांची आवक

Ratnagiri Hapus : बहुप्रतिक्षित कोकण हापूसचा हंगाम बहरात आला आहे. पुणे बाजार समितीत रविवारी (ता. १०) रत्नागिरी येथून हापूस आंब्याच्या सुमारे २ हजार पेट्यांची आवक झाली.

Team Agrowon

Pune News : बहुप्रतिक्षित कोकण हापूसचा हंगाम बहरात आला आहे. पुणे बाजार समितीत रविवारी (ता. १०) रत्नागिरी येथून हापूस आंब्याच्या सुमारे २ हजार पेट्यांची आवक झाली. गेल्या आठवड्याच्या तुलनेत ही आवक दुपटीपेक्षा अधिक होती.

रत्नागिरीसह देवगड येथूनही आंब्याची आवक होत असून, देवगडच्या सुमारे ५० पेट्यांची आवक झाली होती. तर कर्नाटक (Karnataka) येथून हापूससह विविध वाणांचे सुमारे २ हजार बॉक्स आणि करंड्याची आणि सुमारे २०० पेट्यांची आवक झाली.

हापूसच्या हंगामाबाबतची माहिती देताना अडते असोसिएशनचे सचिव आणि कोकण हापूसचे प्रमुख अडतदार करण जाधव म्हणाले, ‘या वर्षी पहिल्या टप्प्यातील मोहर चांगला असल्याने उत्पादनदेखील चांगले आहे. यामुळे पहिल्या टप्प्यातील आवक मोठ्या प्रमाणाव होण्यास सुरुवात झाली आहे.

तापमान वाढू लागल्याने फळेदेखील परिपक्व होण्याच्या स्थितीत असल्याने गेल्या आठवड्याच्या तुलनेत दुपटीपेक्षा अधिक २ हजार पेट्यांची आवक रविवारी (ता. १०) झाली. या वेळी ४, ५ आणि ६ डझनच्या पेटीला ३ ते ४ हजार रुपये तर ५ ते ९ डझनाच्या पेटीला ४ ते ७ हजार रुपये दर मिळाला. हे दर गेल्या आठवड्याच्या तुलनेत ५०० रुपयांनी घटले होते.’

देवगड आंब्याचे (Devgad Mango) अडतदार अरविंद मोरे म्हणाले, ‘देवगड आंब्याची रत्नागिरीच्या तुलनेत आवक कमी होते. रविवारी (ता. १०) ५० पेट्यांची देवगड येथून आवक झाली होती. या वेळी ४ ते ६ डझनाच्या पेटीला ३ हजार ते ४ हजार ५०० रुपये दर होता.’

कर्नाटक आंब्याचे प्रमुख अडतदार रोहन उरसळ म्हणाले, ‘कर्नाटकच्या आंब्याची देखील मोठी आवक सुरू झाली असून २ हजार बॉक्स आणि करंड्यांसह सुमारे २०० लाकडी पेट्यांमधून आंब्याची आवक झाली होती. ही आवक आता टप्प्याटप्प्याने वाढत जाईल. पाडवा आणि अक्षय्यतृतीयेला मुबलक आंबा उपलब्ध राहील.’

कर्नाटक आंब्याचे दर

हापूस आणि पायरी ः ४-५ डझन - १५०० ते २ हजार

लालबाग (एक किलो) ः ६० ते १०० रुपये

बैंगणपल्ली (प्रति किलो) ः ७० ते १०० रुपये

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Supply Schemes Issue: निधीअभावी जलजीवन मिशनच्या ६८ पाणीपुरवठा योजना रखडल्या

Cotton Farming Techniques: हेक्टरी १२ ते १४ क्विंटल कापूस उत्पादनाचे उद्दिष्ट; शास्त्रीय तंत्रज्ञानाचा अवलंब करा

Farmer Loan Waiver: नांदेडमध्ये एक लाख शेतकऱ्यांना कर्जमुक्ती

PM Kisan 24th Installment: शेतकऱ्यांना दिवाळीआधी २ हजार मिळणार; 'पीएम किसान'च्या २४ व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर

Food Conservation: अन्नाची बचत हीच अन्ननिर्मिती; अन्न-पाण्याची नासाडी टाळा : डॉ. इंद्र मणी मिश्रा

SCROLL FOR NEXT