Silk Cocoon Market Agrowon
ॲग्रो विशेष

Silk Market : गुजरात, मध्य प्रदेशमधूनही रेशीम कोषाची आवक

Silk Arrival : जालना बाजारात एप्रिलपासून २८ कोटींवर रेशीम कोष खरेदी

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा

संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा
Silk Farming : जालना : रेशीम कोष खरेदीमध्ये नावलौकिक मिळविलेल्या जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत १ एप्रिल ते १९ डिसेंबरदरम्यान रेशीम कोष खरेदीची जवळपास २८ कोटींवर उलाढाल झाली आहे.

या बाजारपेठेत कोष विक्रीसाठी गुजरातमधील वलसाड व मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर भागातूनही रेशीम कोष उत्पादक शेतकरी येत आहेत.

जालना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये प्रायोगिक तत्त्वावर सुरू झालेली रेशीम कोष खरेदी आता चांगलीच विस्तारली आहे. जालना येथे स्वतंत्र अद्ययावत अशा रेशीम कोष खरेदी बाजारपेठेचे काम अंतिम टप्प्यात असून, त्याच्या लोकार्पणाची प्रतीक्षा आहे.

रेशीम कोष खरेदी बाजारपेठेच्या माहितीनुसार १ एप्रिल ते १९ डिसेंबर २०२३ दरम्यान तब्बल ७ हजार शेतकऱ्यांनी जवळपास ६४९४ क्विंटल रेशीम कोष बाजारात विक्रीसाठी आणला. या कोषाच्या विक्रीतून तब्बल २८ कोटी ३५ लाख ६२ हजार ८३५ रुपयांची उलाढाल रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत झाली.

केवळ महाराष्ट्रातीलच नव्हे तर गुजरातमधील वलसाड येथील पाच ते सहा, तसेच मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर परिसरातील तीन ते चार शेतकरी सातत्याने आपले रेशीम कोष जालना रेशीम कोष खरेदी बाजारात विक्रीसाठी घेऊन येत असल्याची माहिती रेशीम कोष खरेदी बाजारपेठेचे रेशीम विभागाचे क्षेत्र सहायक डॉ. गोविंद गीते यांनी दिली.


जालना रेशीम कोष बाजार समितीमध्ये कोष खरेदीसाठी पश्‍चिम बंगालचे आठ ते नऊ व्यापारी तसेच स्थानिक जवळपास पाच ते सहा व्यापारी येतात असही डॉ. गिते म्हणाले. सोय आणि दर यामुळे जालना रेशीम कोष खरेदी बाजारात येणाऱ्या रेशीम कोष उत्पादकांची संख्या दिवसेंदिवस वाढते आहे.


आधी रेशीम विभाग, नंतर हैदराबाद, बंगळूर आदी ठिकाणी रेशीम कोष विक्रीसाठी घेऊन जाव लागायचे. जवळपास दोन वर्षांपासून जालना बाजारात रेशीम कोष विक्रीसाठी घेऊन जातोय. अलीकडे १६ डिसेंबरलाच रेशीम कोष विक्रीसाठी घेऊन गेलो होतो. जालन्याच्या रेशीम कोष खरेदीमुळे हजारो किलोमीटर जाण्यायेण्याचा त्रास वाचला. दरही अपवाद वगळता अपेक्षित मिळतात.
- देवराव लाहोळे,
अंबाशी, ता. पातूर, जि. अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT