Chilli Market Agrowon
ॲग्रो विशेष

Red Chilli Market : कळमना बाजारात लाल मिरचीची आंध्र प्रदेश, तेलंगणातून आवक

Chlli Arrival : प्रति क्विंटल ४००० ते १५००० रुपये दर

Team Agrowon

Chilli Rate : कळमना बाजार समितीत लगतच्या आंध्र प्रदेश तसेच तेलंगणा राज्यातून लाल मिरचीची आवक वाढती आहे. सध्या लाल (वाळलेल्या) मिरचीला ४००० ते १४ हजार रुपये प्रति क्‍विंटलचा दर मिळत आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेत यात प्रति क्‍विंटल १००० रुपयांची घट नोंदविण्यात आल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली.

कळमना बाजार समितीत एकट्या लाल मिरचीच्या व्यवहारात कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. बाजारात आवक होणाऱ्या लाल मिरचीमध्ये आंध्र प्रदेश तसेच तेलंगणा राज्यातील मिरचीचा सर्वाधीक वाटा आहे. मात्र गेल्या पंधरा दिवसांपासून लाल मिरचीचे दर ५००० ते १५ हजार रुपयांवर स्थिरावल्याचे चित्र आहे.

मधल्या काळात आवक पाच हजार क्‍विंटलवर पोचली असताना दरांनी त्याचवेळी १३ ते १५ हजार रुपयांचा पल्ला गाठला. या काळात लाल मिरचीचा सरासरी दर १४५०० असा होता. १९ ते २० मार्च या कालावधीत हा वाढीव दर मिळाला, असे व्यापारी सूत्रांनी सांगितले.

त्यानंतर पुन्हा २६ मार्चला दराने १३ ते १५ हजार रुपये क्‍विंटलचा पल्ला गाठला. त्यावेळी सरासरी दर १२५०० रुपये होते. त्यानंतर आता पुन्हा ४००० ते १४ हजार असा दर लाल मिरचीला मिळत आहे. बाजारातील मिरचीची आवक २८६९ क्‍विंटलवर स्थिरावल्याची माहिती देखील व्यापारी सूत्रांनी दिली. अमरावती येथील फळे व भाजीपाला बाजार समितीत मंगळवारी (ता.२) एक क्‍विंटलही लाल मिरचीची आवक झाली नाही. या ठिकाणी हिरव्या मिरचीची अत्यल्प ६० क्‍विंटल आवक नोंदविली गेली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT