Ashadhi Wari Agrowon
ॲग्रो विशेष

Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi: माऊलींच्या पालखीचे धर्मपुरीत आगमन

Ashadhi Wari 2025: श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीने सोमवारी धर्मपुरी (सोलापूर) येथे उत्स्फूर्त जयघोषात आणि भक्तिमय वातावरणात प्रवेश केला. दिंड्यांच्या मंगल गजरात, रथाच्या फुलांनी सजलेल्या आगमनाने संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हालेला दिसून आला.

सुदर्शन सुतार

Solapur News:

देव गुज सांगे पंढरीसी यारे।

प्रेमें चित्तीं घ्यारे नाम माझें।।

कायावाचामनें दृढ धरा जीवीं।

सर्व मी चालवी भार त्यांचा।।

असे वारकरी प्रेमांचे आर्त प्रगट करणारे दिंड्यामधून गायले जाणारे अभंग...डौलाने फडकणाऱ्या पताका... रथाला डोळ्यांचे पारणे फेडणारी केलेली आकर्षक फुलांची सजावट... माऊली, माऊली नामांचा अखंड जयघोष करत श्री संत शिरोमणी ज्ञानोबारांयांच्या पालखी सोहळ्याने लाखो वैष्णवांसह सोमवारी (ता. ३०) सोलापूर जिल्ह्यांत धर्मपुरी येथे प्रवेश केला.

पालकमंत्री जयकुमार गोरे, सौ. गोरे, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, आमदार उत्तमराव जानकर, रणजितसिंह मोहिते पाटील, माजी आमदार राम सातपुते, ॲड. रामहरी रूपनवर, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा पोलिस प्रमुख अतुल कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक जंगम,

अतिरिक्त जिल्हा पोलिस प्रमुख प्रीतम यावलकर, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका सिंग ठाकूर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, महिला व बालकल्याण अधिकारी प्रसाद मिरकले, प्रांताधिकारी विजया पांगारकर, तहसीलदार सुरेश शेजूळ उपस्थित होते.

सकाळपासून हजारो वारकरी जिल्ह्यांत प्रवेश करीत होते. सकाळी ९.३० माऊलींच्या नगाऱ्यांचे पाठोपाठ माऊलींच्या व स्वारांच्या अश्वांचे आगमन झाले. या वेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. दिंड्या पाठोपाठ १० वाजता माऊलींच्या रथांचे आगमन झाले. या वेळी उपस्थित मान्यवरांनी माऊलींचे पूजन करून स्वागत केले.

या वेळी मालखी सोहळ्यांचे मालक बाळासाहेब आरफळकर, विश्वस्त, चोपदार राजाभाऊ, रामभाऊ, बाळासाहेब यांचा सन्मान करण्यात आला. या वेळी सातारा जिल्हा समारोपास जिल्हाधिकारी व विविध खात्यांचे अधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT