Carrot  Agrowon
ॲग्रो विशेष

Washi APMC : ‘एपीएमसी’त जयपुरी गाजरांची आवक

Jaipuri Carrot : राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे बाजारात लाल गाजरांची आवक वाढली आहे. मोठ्या प्रमाणात गाजर बाजारात आल्याने गाजरांचे भाव ३० ते ४० टक्क्यांनी घसरले आहेत.

Team Agrowon

Thane News : राज्यात थंडीचा जोर वाढला आहे. त्यामुळे बाजारात लाल गाजरांची आवक वाढली आहे. मोठ्या प्रमाणात गाजर बाजारात आल्याने गाजरांचे भाव ३० ते ४० टक्क्यांनी घसरले आहेत. आठवडाभरापूर्वी २८ ते ६० रुपयांना मिळणाऱ्या गाजरांची किंमत घसरून १८ ते ३८ रुपये किलोवर आली आहे.

वाशीच्या एपीएमसी बाजारात गेल्या आठवड्यापासून भाज्यांची आवक वाढली आहे. त्यात राजस्थान येथील जयपूरहून आलेले लाल गाजर ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. वाशी एपीएमसी भाजीपाला बाजारात सोमवारी (ता. ९) २,२०९ क्विंटल गाजरांची आवक झाली. गेल्या आठवडाभरापासून चांगली आवक होत असल्‍यामुळे भावही काहीसे कमी झाले आहेत.

लाल गाजरांसोबतच मध्य प्रदेशातून आलेली नारंगी रंगांची गाजरेदेखील बाजारात पाहायला मिळत आहेत. गाजर हे पीक भारतातील एक प्रमुख पीक असून बाजारात कमी-जास्त प्रमाणात बाराही महिने उपलब्ध असते. हिवाळ्यात गाजराला विशेष महत्त्व आहे. हरियाना हे गाजराचे प्रमुख उत्पादक राज्य असून कर्नाटक, आंध्र प्रदेश, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश येथून देशभरात गाजरे विक्रीस पाठवली जातात.

यातील बिटा कॅरोटीनमुळे वाढत्या वयामुळे होणाऱ्या डोळ्यांच्या आजारांपासून बचाव होतो. हिवाळ्यात पेशींमध्ये पाणी गोठू नये म्हणून गाजर आपल्यातील स्टार्चचे रूपांतर साखरेत करतात. यामुळे विशेषतः हिवाळ्यात गाजराचा गोडवा वाढलेला असतो. गाजरांचे अनेक प्रकार असले तरी देशी आणि विदेशी गाजर असा फरक करता येऊ शकतो.

देशी गाजरे गडद लाल रंगाची असतात; तर विदेशी गाजरांचा रंग काहीसा फिकट लाल असतो. देशी गाजरे चवीला गोड असतात; तर विदेशी चवीला फिकट, पण पाणीदार असतात. दिवसातून एक गाजर खावे जेणेकरून शरीरातील फायबरचे आणि साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी मदत होते. गाजरात व्हिटॅमीन ए, के, सी, पोटॅशियम आणि कॅल्शियम असल्याने शरीराला ऊर्जा देण्यासोबतच शरीर डिटॉक्स करण्याचे कामही गाजर करते.

एपीएमसीतील सोमवारची आवक २,२०९ क्विंटल

घाऊक भाव १८ ते ३८ रुपये प्रतिकिलो

सध्या बाजारात गाजरांची आवक चांगली होत आहे. त्यामुळे भाव कमी झाले असून, गाजर खरेदीसाठी ग्राहकांचा कल वाढला आहे. थंडी वाढल्याने गाजरांनादेखील मागणी वाढली आहे. थंडीच्या काळात गाजर लवकर नरम पडत नाहीत. अधिक काळ टिकत असल्याने व्यापारी आणि विक्रेत्यांनाही त्याचा फायदा मिळतो.
- सुरेश गुप्ता, भाजी व्यापारी, एपीएमसी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sangola Water Crisis: सांगोल्यातील बंधारे कोरडे; जलसंकट वाढले

Farmer Compensation: बाधित शेतकऱ्यांच्या मोबदल्यासाठी खलबते

Fruit Drop Subsidy Issue: संत्रा, मोसंबी, फळगळ अनुदानामध्ये गोंधळ

Fund Delay: स्थगितीला वाव देण्यासाठी निधी वर्ग करण्यास उशीर?

Maharajasva Campaign: महाराजस्व अभियान यशस्वी करण्यासाठी समन्वयाने काम करा: जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

SCROLL FOR NEXT