Arfal Irrigation Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Arfal Irrigation Scheme : आरफळ सिंचन योजनेचे आवर्तन सुरू; रब्बी हंगामाला गती!

Arfal Project Water Supply : रब्बी हंगामासाठी कडेगाव, खानापूर, पलूस व तासगाव या चार तालुक्यांतील ३७ गावांना सुमारे १६ हजार ४५८ हेक्टर लाभक्षेत्रातील शेतीपिकांना दिलासा देणाऱ्या आरफळ योजनेचे आवर्तन सुरू झाले.

Team Agrowon

Sangli News : रब्बी हंगामासाठी कडेगाव, खानापूर, पलूस व तासगाव या चार तालुक्यांतील ३७ गावांना सुमारे १६ हजार ४५८ हेक्टर लाभक्षेत्रातील शेतीपिकांना दिलासा देणाऱ्या आरफळ योजनेचे आवर्तन सुरू झाले.

त्यामुळे या चार तालुक्यांतील ऊस पिकांसह अन्य पिकांसाठी आता पुरेसे पाणी उपलब्ध होणार आहे. हे आवर्तन जानेवारी अखेरपर्यंत चालणार असल्याने लाभक्षेत्राला महिनाभरात भरपूर पाणी मिळणार आहे.

नेहमी आरफळ योजना डिसेंबरअखेर सुरू केली जाते. आरफळ योजनेचे पाणी येरळा नदीत सोडले जाते. त्यामुळे अर्धा हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात पिकांना पुरेसे पाणी उपलब्ध होते. सद्य:स्थितीत ताकारी योजनेचे आवर्तन सुरू आहे. त्यामुळे या योजनेच्या लाभक्षेत्राला दिलासा मिळाला आहे.

मात्र, ताकारी योजनेपासून अनेक गावे वंचित आहेत. या वंचित गावांना आरफळ योजनेचे पाणी दिले जाते. त्यामुळे या गावांतील द्राक्ष, ऊस शेतीला या योजनेचे शाश्वत पाणी मिळणार आहे. त्यामुळे आरफळ योजनेचे पाणी सोडण्याची मागणी लाभक्षेत्रातील शेतकरी करीत होते. त्याप्रमाणे पाटबंधारे विभागाने आवर्तन सुरू केले आहे.

आरफळ योजनेच्या लाभक्षेत्रातील संपूर्ण क्षेत्र बागायत असल्याने शेतीला मोठ्या प्रमाणावर पाण्याची गरज असते. आता आवर्तन सुरू झाल्याने लाभक्षेत्रातील बहुतांशी क्षेत्राला पाणी मिळेलच शिवाय विहिरी, कूपनलिकांची पाणी पातळी वाढणार आहे.

आरफळचे तालुकानिहाय लाभक्षेत्र (हेक्टरमध्ये)

कडेगाव ४ गावे -४७० हेक्टर

खानापूर ६ गावे -१९६० हेक्टर

पलूस ६ गावे - २३६९ हेक्टर

तासगाव २१ गावे -११,९५९ हेक्टर

एकूण ३७ गावांमध्ये १६ हजार ७५८ हेक्टर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Insurance : एक लाख १७ हजार हेक्टरवरील पिकांना विमा कवच नाही

Industrial Investment : औद्योगिक गुंतवणुकीला सुरक्षा, सुविधा उपलब्ध करून देणार

Dairy Industry : सलग तीन महिने दूध संकलनात घट

Loan Waiver : दुसऱ्या टप्प्यात किती शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ?

Finlay Mill Amravati : फिनले मिलसाठी हवा ४१ कोटींचा निधी

SCROLL FOR NEXT