Crop Damage Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Damage : खानदेशात पिके, फळबांगाचे नुकसानीचे क्षेत्र वाढतेच

Unseasonal Rain : खानदेशात मागील चार-पाच दिवसांपासून रोज विविध भागात पाऊस, वादळ सुरू आहे.

चंद्रकांत जाधव ः अॅग्रोवन वृत्तसेवा

Jalgaon News : खानदेशात मागील चार-पाच दिवसांपासून रोज विविध भागात पाऊस, वादळ सुरू आहे. यात रोज नुकसान वाढत असून, पंचनामा अहवाल अंतिम झालेला नसल्याची स्थिती आहे.

जळगाव जिल्ह्यात तीन हजार हेक्टरवर नुकसानीचे पंचनामे झाले होते. त्यात पाऊसही सुरूच आहे. गुरुवारी (ता.११) रात्री अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस झाला. तसेच काही भागात वादळही आले. यामुळे नुकसानीची आकडेवारी वाढली आहे. धुळे व नंदुरबारातही काही भागात वादळी पाऊस झाला आहे.

सोमवार ते बुधवार या कालावधीत झालेल्या नुकसानीचा अहवाल जळगाव जिल्हा कृषी विभागाने जिल्हा प्रशासनास सादर केला होता. त्यात ३८४० शेतकरी बाधित असल्याची माहिती आहे.

केळी, मका, गहू, ज्वारी, मका, केळी, आंबा, भाजीपाला, लिंबू, तीळ या पिकांचे नुकसान झाले आहे. एकूण १२३ गावे बाधित झाल्याचे म्हटले आहे. परंतु पाऊस सुरूच असल्याने नुकसानीची आकडेवारीदेखील वाढली आहे. यासंबंधीची माहिती प्रशासनाला संकलित करावी लागणार आहे.

धुळे व नंदुरबारातही सुमारे ११०० हेक्टरवर पिकांचे नुकसान झाले आहे. काही भागात अंशतः नुकसान झाले आहे. केळी पिकाचेही नुकसान सुरूच आहे. काही भागात खुडलेली कणसे भिजून त्यांची नासाडी झाली आहे. यंत्रणा मात्र नुकसानीची टक्केवारी व अन्य बाबींची कारणे पुढे करीत आहे. याचीही नाराजी जळगाव, धरणगाव व अन्य भागात शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

पुन्हा पिकांची हानी

गुरुवारी खानदेशात धुळ्यातील शिरपूर, धुळे, शिंदखेडा, जळगाव जिल्ह्यातील जळगाव, धरणगाव, चोपडा, भुसावळ, जामनेर, यावल आदी भागात पाऊस झाला. याचा फटका कलिंगड, मका आदी पिकांना बसला. पुन्हा किमान १२०० ते १३०० हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. पंचनामे प्रशासन करीत आहे. काही भागात पंचनाम्यांसाठी प्रशासन पोचलेले नाही.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT