Fodder Cultivation Agrowon
ॲग्रो विशेष

Fodder Cultivation : चारा लागवडीसाठी एक हजार हेक्टर जमिनीस मान्यता द्या

Grazing Land : शेतकरी स्वावलंबन योजनेअंतर्गत जिल्ह्यात गायरान जमिनीवर चारा लागवडीसाठी हजार हेक्टरवर क्षेत्र आहे.

Team Agrowon

Beed News : शेतकरी स्वावलंबन योजनेअंतर्गत जिल्ह्यात गायरान जमिनीवर चारा लागवडीसाठी हजार हेक्टरवर क्षेत्र आहे.याला प्रशासकीय मान्यता द्या अशा सूचना स्वर्गीय वसंतराव नाईक शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड.निलेश हेलोंडे पाटील यांनी दिल्या.

वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड निलेश हेलोंडे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मिशनसंबंधी जिल्हास्तरीय आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली.या बैठकीस जिल्हाधिकारी अविनाश पाठक, निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी, जिल्हा पुरवठा अधिकारी ओंकार देशमुख, जिल्हा कृषी अधिकारी विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबाला विविध शासकीय योजनांचा लाभ मिळवून देणेबाबत निर्देशही कै. वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष ॲड निलेश हेलोंडे यांनी दिले. पशुधनाच्या चाऱ्यासंबधी जिल्हाधिकारी पाठक यांनी पीपीटीव्दारे माहिती सादर केली.कार्यक्रमाचे आभार निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी मानले.

ॲड हेलोंडे पाटील यांच्या सूचना

उपजिल्हाधिकारी रोहयो, बीड यांनी गायरान १००० हेक्टरवर चारा लागवड करण्यासाठी प्रशासकीय मान्यता द्यावी.

जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी यांनी पीक विमा योजना कंपनीच्या प्रतिनिधीचे नाव व मोबाईल क्रं. ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध करावे

शेतीच्या बांधावर जैविक प्रयोगशाळेची उभारणी करण्यासाठी खामगाव ता. गेवराई व डिघोळअंबा ता. अंबाजोगाई या ठिकाणी प्रत्येकी १० कॅम्प आयोजित करून ५०० मास्टर ट्रेनर्स तयार करावेत.

प्रेरणा प्रकल्पांतर्गत आरोग्य कर्मचारी यांनी घरोघरी जाऊन माहिती द्यावी व आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचे कुटुंबीयांना भेटी द्याव्या, त्यांचे मानसिक स्वास्थ्याची काळजी घ्यावी.

सर्व कृषी उत्पन्न बाजार समितींच्या व सर्व ग्रामपंचायतींच्या नोटीस बोर्डवर शेतीमालाचा भावफलक लावण्यात यावा.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी शेतीमालाच्या आधारभूत किंमती बाबत व्यापक प्रसिध्दी द्यावी.

सहआयुक्त,कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता व नाविण्यता विभागाने त्यांच्या विभागाच्या योजनांची माहिती द्यावी.

शिक्षणाधिकारी यांनी शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटुंबांच्या वारसांना स्पर्धा परीक्षेसाठी पुस्तके उपलब्ध करून द्यावे.

जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी सावकारीच्या उर्वरित प्रकरणांमध्ये ३ महिन्यात निर्णय घ्यावा.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rain Alert: राज्यात २ दिवस पावसाचा अंदाज; राज्यातील बहुतांशी भागात ढगाळ हवामानामुळे थंडी कमी

Ration Card Verification: रेशनचे पावणेदोन लाख संशयित लाभार्थी रडारवर!

Parliament Budget Session 2026: राहुल गांधींकडून नरवणेंच्या पुस्तकाचा उल्लेख, लोकसभेत गदारोळ, नेमकं काय झालं?

Mission Mausam : 'मिशन मौसम'साठी अर्थसंकल्पात वाढीव तरतूद; तर 'डीप ओशन मिशन'साठी तरतूद घटली

Tiger Attack: वाघाच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू

SCROLL FOR NEXT