Free Electricity  Agrowon
ॲग्रो विशेष

Free Electricity Scheme : मोफत वीज योजनेस मान्यता

Electricity Bill Waiver Scheme : राज्यातील शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तींच्या पंपांपर्यंत पूर्ण वीजबिल माफी योजना पुढील पाच वर्षांसाठी राबविण्यात येणार आहे. मात्र, या योजनेचा तीन वर्षांनी आढावा घेऊन ती पुढे राबविण्यात येणार आहे.

Team Agrowon

Mumbai News : राज्यातील शेतकऱ्यांना साडेसात अश्वशक्तींच्या पंपांपर्यंत पूर्ण वीजबिल माफी योजना पुढील पाच वर्षांसाठी राबविण्यात येणार आहे. मात्र, या योजनेचा तीन वर्षांनी आढावा घेऊन ती पुढे राबविण्यात येणार आहे.

या बाबत शासन आदेश काढला असून महावितरण कंपनीला मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेसाठी राज्य सरकार १४ हजार ७६० कोटी रुपयांची प्रतिपूर्ती करणार आहे. राज्यात सध्या ४७.४१ लाख कृषिपंप ग्राहक असून या ग्राहकांपैकी १६ टक्के ग्राहकांकडून ३० टक्के ऊर्जेचा वापर केला जातो. सध्या कृषी पंपांसाठी राज्यात ३९ हजार, २४६ दशलक्ष युनिट विजेचा वार्षिक वापर होतो असे महावितरणचे म्हणणे आहे.

सध्या शेतकऱ्यांना चक्राकार म्हणजे रात्री १० आणि दिवसा आठ ते सात वीज दिली जाते. मात्र, या शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. यासाठी मागेल त्याला सौर पंप योजनाही राबविण्यात येत आहे. सौर उर्जीकरणासाठी राज्यात पुरेशी जमीन उपलब्ध असल्याची माहितीही ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पाच्या चर्चेच्या उत्तरात दिली होती.

तसेच ही योजना पुढील तीन वर्षांत पूर्णत्वाला आल्यास शेतकऱ्याला दिवसा वीज देणे शक्य असल्याचे सांगितले होते. ही वीज शेतकऱ्यांना मोफत असेल असेही सांगण्यात आले आहे. मात्र, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना खूष करण्यासाठी पुढील पाच वर्षांसाठी मोफत विजेचा निर्णय घेण्यात आला आहे.

यासाठी वार्षिक १४ हजार ७६० कोटी रुपयांच्या अनुदानाचाही निर्णय घेण्यात आला आहे. ज्या शेतकऱ्यांना ७.५ अश्वशक्तीपर्यंतचा शेतीपंपांसाठी भार मंजूर करण्यात आला आहे, त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. राज्य सरकार दरवर्षी शेतीपंपांसाठी सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून दिल्यापोटी ६९८५ कोटी रुपये देते. तरी आता वीजबिल सवलतीपोटी ७,७७५ कोटी रुपये असे १४ हजार ७६० कोटी रुपये आगाऊ स्वरूपात देणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Indian Economy : अर्थव्यवस्थेत पहिल्या तिमाहीत ७.८ टक्के वाढ; शेतीचं चित्र पावसावर अवलंबून

Plant Nutrition: अन्नद्रव्ये पिकांना कशी मिळतात?

Chickens Breeding Management: ब्रीडर कोंबड्यांचे प्रजनन व्यवस्थापन

Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती

Chakan Livestock Market: नावारूपाला आलेला चाकणचा जनावरांचा बाजार

SCROLL FOR NEXT