Agriculture  Agrowon
ॲग्रो विशेष

Farmers Insurance Scheme : मुंडे अपघात अनुदान योजनेतून दक्षिण सोलापुरातील पाच प्रस्तावांना मंजुरी

Agriculture Scheme : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील सहा शेतकऱ्यांच्या प्रस्तावांपैकी पाच प्रस्तावांना नुकतीच मंजुरी मिळाली.

Mahesh Gaikwad

Solapur News : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेअंतर्गत दक्षिण सोलापूर तालुक्यातील सहा शेतकऱ्यांच्या प्रस्तावांपैकी पाच प्रस्तावांना नुकतीच मंजुरी मिळाली. आता त्यांच्या वारसांना ही मदत देण्यात येणार आहे.

तालुका कृषी अधिकारी कार्यालयाकडे या योजनेसाठी एकूण सहा प्रस्ताव आले होते. त्यापैकी पाच प्रस्तावांना तहसीलदार किरण जमदाडे, अप्पर तहसीलदार आर. सी. लिंबारे, तालुका कृषी अधिकारी आर. बी. माळी यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.

सहापैकी एक प्रस्ताव अपूर्ण असल्याने कागदपत्रे प्राप्त होईपर्यंत पुढील सभेपर्यंत प्रलंबित ठेवण्यात आला. या योजनेमध्ये अपघातात मृत्यू, दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय, एक डोळा व एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास दोन लाख रुपये अनुदान, एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास एक लाख रुपये अनुदान दिले जाते.

...यांना मिळणार मदत

मदत मंजूर झालेल्या अपघातग्रस्त शेतकरी आणि त्यांच्या लाभार्थीं वारसांची नावे अनुक्रमे - (कै.) शमशाद महेबूब शेतसंदी यांचे वारसदार- महेबूब गफूर शेतसंदी, (कै.) सुरेश भगवान कोळी यांचे वारसदार- श्रीमती कमलाबाई सुरेश कोळी (घंटे) , (कै.) दिगंबर शिवाजी नवले वारसदार - श्रीमती सुनीता दिगंबर नवले (मंद्रुप), (कै.) विठ्ठल कोंडीबा शिंगाडे वारसदार-श्रीमती मालन विठ्ठल शिंगाडे (औज आ), (कै.) दयानंद श्रीमंत चेंडके वारसदार- श्रीमती उज्वला दयानंद चेंडके (संगदरी) यांचा त्यात समावेश आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sunflower Farming: वाणगावात सूर्यफुलाची शेती बहरली

Hapus Mango Fraud: हापूसच्या नावाने फसवणूक

Wheat Market: गव्हाची वाढली आवक, पण ज्वारीने खाल्ला भाव

Floriculture Project: विद्यापीठामध्ये आठ एकरवर फुलपिके संशोधन, व्यावसायिक फुलशेती प्रकल्प

Women Empowerment: औसा तालुक्यातील चाळीस गावात महिला अस्मिता भवन

SCROLL FOR NEXT