Gharkul Yojana Agrowon
ॲग्रो विशेष

Modi Awas Yojana : ‘मोदी आवास’मधून साडेआठ हजार घरकुलांना मंजुरी

PM Awas Yojana : ओबीसी घटकातील बेघर लाभार्थींसाठी राज्य सरकारने मोदी आवास योजना सुरू केली आहे.

Team Agrowon

Solapur News : ओबीसी घटकातील बेघर लाभार्थींसाठी राज्य सरकारने मोदी आवास योजना सुरू केली आहे. त्याअंतर्गत सोलापूर जिल्ह्यातील दहा हजार २९३ बेघरांना २०२३-२४ या आर्थिक वर्षांत घरकुले मिळणार आहेत. जिल्हा परिषदेने त्यापैकी साडेआठ हजार घरकुलांना मंजुरी दिली आहे. अवघ्या एका महिन्यांत ८२ टक्के घरकुलांना मंजुरी देणारी सोलापूर जिल्हा परिषद राज्यात अव्वल ठरली आहे.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना आणि राज्य सरकारच्या रमाई, शबरी योजनांच्या माध्यमातून बेघर कुटुंबांना हक्काचा निवारा देण्यात आला. आता राज्य सरकारने ओबीसी घटकांसाठी मोदी आवास योजना सुरू केली. त्याअंतर्गत राज्यभरात जवळपास ३० लाख घरकुले बांधली जाणार आहेत.

त्यात सोलापूर जिल्ह्यातील ६२ हजार २१८ घरकुले आहेत. या योजनेसाठी ५ डिसेंबर २०२३ रोजी पहिल्या वर्षीच्या (२०२३-२४) दहा हजार २९३ घरकुलांपैकी अवघे तेराशेच प्रस्ताव जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे प्राप्त झाले होते. त्यावेळी सीईओ मनीषा आव्हाळे यांनी काम न करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.

त्यानंतर ४ जानेवारी २०२४ पर्यंत साडेआठ हजार प्रस्ताव प्राप्त झाले आणि सध्या जिल्ह्यातील आठ हजार ४९८ घरकुलांना मंजुरी देण्यात आली. दुसरीकडे ''एसबीसी'' प्रवर्गातील ७२६ पैकी ५८४ घरकुलांनाही मंजुरी मिळाली आहे.

आता निधीची प्रतीक्षा

राज्य सरकारच्या मोदी आवास योजनेतून २०२३-२४ पासून पुढील तीन वर्षांतील घरकुलांचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून चालू वर्षातील घरकुलांना मंजुरीही देण्यात आली आहे.

लाभार्थींना घरकुलाचे बांधकाम सुरू करण्यासाठी सुरवातीला १५ हजार रुपये दिले जातात. मात्र, अद्याप शासनाकडून या योजनेला निधी प्राप्त झालेला नाही. त्यामुळे मंजुरी मिळालेल्या लाभार्थींना बांधकाम सुरू करण्यासाठी अजून काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Result 2024 : विधानसभा निवडणूक निकालानंतर काय म्हणतायत राजकीय नेते?

Mahayuti Sarkar Formation Formula : महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा फॉर्म्युला ठरला?; अजित पवारांची पक्षाच्या गटनेतेपदी निवड

Congress On Mahayuti : लाडकी बहीण, शेतकरी कर्जमाफीसह जनतेला दिलेल्या आश्वासनांची भाजप महायुतीने पुर्तता करावी; काँग्रेसची मागणी

Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेते पदी अजित पवार 'पुन्हा' ; आमदारांच्या बैठकीत निवड

Soybean Productivity : शासकीय खरेदीसाठी सोयाबीनची उत्पादकता जाहीर

SCROLL FOR NEXT