Biogas Project Kolhapur agrowon
ॲग्रो विशेष

Biogas Project Kolhapur : कोल्हापुरात बायोगॅस प्रकल्पाला मंजुरी; ओला, सुका कचऱ्यावर होणार प्रक्रिया

Kolhapur Biogas Project : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) दोन अंतर्गत महापालिकेच्या प्रतिदिन २० टन क्षमतेच्या बायोगॅस प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिली.

sandeep Shirguppe

Biogas Project : स्वच्छ महाराष्ट्र अभियान (नागरी) दोन अंतर्गत महापालिकेच्या प्रतिदिन २० टन क्षमतेच्या बायोगॅस प्रकल्पाला शासनाने मंजुरी दिली. यामुळे संकलित केल्या जाणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. चार कोटी ४१ लाखांच्या प्रकल्पात केंद्र, राज्य व स्थानिक स्वराज्य संस्थेचा हिस्सा आहे.

महापालिकेच्यावतीने शहरात ओला व सुका कचरा संकलित केला जातो. सुक्या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते, तर ओल्या कचऱ्यातून बायोगॅसनिर्मितीचे तीन प्रकल्प यापूर्वी महापालिकेने उभे केले आहेत. त्यातील ३० टन क्षमतेचा कसबा बावडा येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पावर एक आहे. दुसरा पुईखडी येथे आहे. तो पाच टन प्रतिदिन क्षमतेचा आहे. तसेच बापट कॅम्प

कत्तलखान्याजवळ एक बायोगॅस प्रकल्प आहे. तो वगळून इतर ठिकाणी वीजनिर्मिती केली जात आहे. याव्यतिरिक्त राहणाऱ्या ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी आणखी एक २० टनाचा प्रकल्प आवश्यक होता. त्यानुसार महापालिकेने हा प्रस्ताव सादर केला होता.

नगरविकास विभागाच्या प्रधान सचिवांच्या अध्यक्षतेखालील राज्यस्तरीय तांत्रिक समितीने ८ जानेवारीला तांत्रिक मंजुरी दिली होती. त्यानंतर हा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेसाठी नगरविकास विभागाकडे पाठवला होता.

आज त्याला अटी, शर्थीच्या आधीन राहून प्रशासकीय मंजुरी देण्यात आली. चार कोटी ४१ लाखांच्या प्रकल्पात केंद्र सरकारचा एक कोटी १८ लाख, राज्य सरकारचा एक कोटी ३३ लाख तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा एक कोटी आठ लाखाचा हिस्सा आहे.

दररोज ५० टन कचऱ्यावर प्रक्रिया

कसबा बावडा येथेच हा २० टनाचा प्रकल्प साकारला जाणार आहे. त्यामुळे दररोज संकलित होणाऱ्या ओल्या कचऱ्यातील ५० टन कचऱ्यावर प्रक्रिया होणार आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यानंतर परिसरात पसरणारी दुर्गंधी कमी होण्यास मदत होणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Massive Agricultural Crisis : बळीराजा उद्ध्वस्त! ८ लाख हेक्टरवरील पिके मातीमोल

Satara Rabi Season : सातारा जिल्ह्यात 'रब्बी'ची केवळ ५ टक्केच पेरणी पूर्ण; पाऊस गायब झाल्याने बळीराजा संकटात!

Nar-Par Girna Project : नार-पार, गिरणा नदीजोड प्रकल्पाला तीव्र विरोध; जमिनी आणि पाणी वाचवण्यासाठी शेतकरी एकवटले!

Agriculture Electricity : शेतीपंपांच्या विजेसाठी चामोर्शीत बळीराजा आक्रमक; संतप्त शेतकऱ्यांनी मुख्य रस्त्यावर केला चक्काजाम!

Hingoli Agriculture Crisis : हिंगोली जिल्ह्यात शेती वाचवा अभियान सुरू

SCROLL FOR NEXT