Amravati ZP Agrowon
ॲग्रो विशेष

Amravati ZP : अमरावती ‘झेडपी’च्या २५ कोटींच्या अर्थसंकल्पाला मान्यता

२०२३-२४ चा जिल्हा परिषदेच्या २५ कोटी सात लाख ४२ हजार ५६० रुपयांच्या अर्थसंकल्पाला मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी मंजुरी दिली.

Team Agrowon

Amravcati News : महिला लोकप्रतिनिधींसाठी जिल्हा परिषदेत हक्काचे प्रतीक्षालय, पशूंच्या आरोग्यासाठी खनिज व चाटण औषधासाठी स्वतंत्र निधी, इंद्रधनुष्य शाळांची गुणवत्तावाढ, अतिदुर्गम भागातील शाळांमध्ये रिक्त पदांची पूर्तता, अशा अनेक नावीन्यपूर्ण योजना यंदाच्या जिल्हा परिषदेच्या अर्थसंकल्पाची प्रमुख वैशिष्ट्ये ठरली आहेत.

२०२३-२४ चा जिल्हा परिषदेच्या २५ कोटी सात लाख ४२ हजार ५६० रुपयांच्या अर्थसंकल्पाला मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी मंजुरी दिली.

जिल्हा परिषदेच्या डॉ. पंजाबराव देशमुख सभागृहात प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अर्थसंकल्पाच्या मुख्य फिचर्सवर प्रकाश टाकला. यावेळी सभागृहात विविध खात्यांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

विशेष म्हणजे, प्रशासक म्हणून अविश्यांत पंडा यांनी अर्थसंकल्पामध्ये अनेक नवीन योजनांची भर टाकल्याने खऱ्या अर्थाने यंदाचा अर्थसंकल्प नावीन्यपूर्ण बनला.

२०२२-२३ चे २३ कोटी ४ लाख ७९ हजारांचा सुधारित, तर २०२३-२४ च्या २५ कोटी सात लाख ४२ हजारांच्या मूळ अंदाजपत्रकाला या सभेत मंजुरी देण्यात आली. विशेष म्हणजे, जिल्हा परिषदेचा हा अर्थसंकल्प स्वउत्पन्नाचा असून मागील वर्षीच्या तुलनेने स्वउत्पनामध्ये तीन कोटींची वाढ झाल्याची समाधानकारक बाब अर्थसंकल्पात दिसून आली.

मुख्य वित्त व लेखाधिकारी चंद्रशेखर खंडारे यांनी प्रस्तावनेत अर्थसंकल्पीय बाबींवर प्रकाश टाकला. प्रत्येक तालुक्यातून एका जि. प. शाळेची निवड इंद्रधनुष्य शाळा म्हणून करण्यात आली असून त्यासाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे.

शिवाय जिल्हा परिषदेत कामासाठी किंवा सभेकरिता येणाऱ्या महिला सदस्य, लोकप्रतिनिधींसाठी आजवर नसलेल्या प्रतीक्षालयाचा प्रकर्षाने या अर्थसंकल्पात विचार करण्यात आला आहे.

सभेला मुख्य वित्त व लेखाधिकारी चंद्रशेखर खंडारे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम टेकाळे, पाणी व स्वच्छता विभागाचे श्रीराम कुलकर्णी, डॉ. कैलास घोडके, गिरीश धायगुडे, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदीप देशमुख, बांधकामचे कार्यकारी अधिकारी दिनेश गायकवाड, उपअभियंता राजेश लाहोरे, पंकज गुल्हाने, प्रज्ज्वल घोम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT