Gharkul Scheme Agrowon
ॲग्रो विशेष

Gharkul Yojana : जळगाव जिल्ह्यात रमाई आवासच्या १८४५ घरकुलांना मंजुरी

Ramai Awas Yojana : या रमाई आवास योजनेत २०२३-२४ साठी जिल्ह्यासाठी ३ हजार ५६६ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १ हजार ८४५ लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे.

Team Agrowon

Jalgaon News : सामाजिक न्याय विभागातर्फे अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांच्या स्वतःच्या हक्काचे घर उभारणीच्या स्वप्नाला पूरक असलेल्या रमाई आवास घरकुल या अत्यंत महत्त्वाकांक्षी योजनेतंर्गत जिल्ह्यात २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी १ हजार ८४५ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे.

रमाई घरकुल आवास योजना ही एक अत्यंत महत्त्वाची आणि महत्त्वाकांक्षी राज्य पुरस्कृत योजना असून ज्यांना निवासाची व्यवस्था नाही अशा सर्व आर्थिक दुर्बल असणाऱ्या व सर्वसामान्यांना नागरिकांना स्वतःच्या जागेवरती राज्य सरकार पक्क्या स्वरूपाची घरबांधणीची व्यवस्था करून देत असल्याने ही योजना वरदान ठरत आहे.

या रमाई आवास योजनेत २०२३-२४ साठी जिल्ह्यासाठी ३ हजार ५६६ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट होते. त्यापैकी १ हजार ८४५ लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे. यामध्ये मातंग समाजातील १४२ व मातंग समाज वगळून इतर अनुसूचित जाती १ हजार ७०३ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे.

मंजूर करण्यात आलेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील आर्थिक दुर्बल कुटुंबांचे स्वतःच्या हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रमाई आवास योजनेच्या माध्यमातून पात्र असलेल्या प्रत्येकाला या योजनेचा लाभ देण्याचा प्रयत्न आहे, असे प्रशासनाने म्हटले आहे.

जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी अंकित व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे यांनी रमाई आवास योजनेचा जिल्ह्यातील प्रगतीचा वेळोवेळी आढावा घेतला आहे.

तालुका निहाय मंजूर घरकुले

तालुका घरकुले

जळगाव १२७

धरणगाव ११७

अमळनेर ३२

चाळीसगाव २२६

पाचोरा २५

भडगाव ३८

एरंडोल ८१

पारोळा ४३१

भुसावळ ४९

जामनेर १४१

चोपडा ८०

मुक्ताईनगर २५२

बोदवड ११४

रावेर ९२

यावल ४०

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Fertilizer Supply: जेवढी शेतीसाठी गरज, तेवढेच खत शेतकऱ्यांना मिळणार, कृषी विभागाचा निर्णय

Crop Insurance: शेतकऱ्यांना खरिपासाठी एकूण किती भरपाई आतापर्यंत मंजूर झाली?

Parbhani Kharif Planning: खरिपासाठी ७९ हजार ५२२ क्विंटल बियाण्याची मागणी

DJ Noise Incident: लग्नाच्या वरातीत डीजेचा दणदणाट, १४० कोंबड्यांचा मृत्यू, गुन्हा नोंद

Mango Loss 2026: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबा, काजू नुकसानीचे पंचनामे सुरू

SCROLL FOR NEXT