Agriculture Department Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture Department : दोन महिन्यांत अनुकंपा तत्त्वावर नियुक्ती करा

Agriculture News : प्रशासकीय न्यायाधिकरणाचा (मॅट) निकाल कायम ठेवत वडीलांच्या जागी मुलाला अनुकंपा तत्त्वावर नियुक्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कृषी विभागाला दिले.

Team Agrowon

Nagpur News : प्रशासकीय न्यायाधिकरणाचा (मॅट) निकाल कायम ठेवत वडीलांच्या जागी मुलाला अनुकंपा तत्त्वावर नियुक्त करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने कृषी विभागाला दिले. मॅटच्या या आदेशाविरोधात कृषी विभागाने उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली होती.

या प्रकरणी न्यायमूर्ती अविनाश घरोटे आणि न्यायमूर्ती मुकुलिका जवळकर यांच्या समक्ष सुनावणी झाली. चंद्रपूर येथे कृषी विभागामध्ये कृषी सहायक म्हणून प्रभाकर दराडमारे सेवा बजावत होते.

२००४ मध्ये त्यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी प्रतिमा यांनी कृषी विभागाकडे अनुकंपा नियुक्तीसाठी अर्ज केला. मात्र त्यांना दहा वर्षे प्रतीक्षा यादीत ठेवण्यात आले आणि अखेर वयोमर्यादा ओलांडल्याच्या बहाण्याने त्यांचे नाव प्रतीक्षा यादीतून रद्द करण्यात आले.

मुलगा मयूर यांचे नाव प्रतीक्षा यादीत टाकण्याचा अर्जही कृषी विभागाने फेटाळला. त्यानंतर, प्रतिमा दराडमारे यांनी मॅटमध्ये धाव घेत प्रतिक्षा यादीमध्ये मुलाचा समावेशकरीत नियुक्तीबाबत आदेश देण्याची विनंती केली होती.

मॅटने मुलगा मयूर याला दोन महिन्यांत अनुकंपा नोकरी देण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु कृषी विभागाने मॅटच्या आदेशाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उच्च न्यायालयाने मॅटचा आदेश कायम ठेवला.

तसेच मुलगा मयूर दराडमारेला दोन महिन्यांत वर्ग तीनमध्ये अनुकंपा नियुक्ती देण्याचे आदेश याचिकाकर्त्या कृषी विभागाला दिले. प्रतिवादी दराडमारे कुटुंबीयांतर्फे ॲड. अरविंद वाघमारे यांनी व कृषी विभागातर्फे ॲड. आर. व्ही. शर्मा यांनी बाजू मांडली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Update: कोकण, घाटमाथा, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज

Drought Situation: दुष्काळस्थितीत यंत्रणांनी सतर्क राहावे : कृषिमंत्री भरणे

Ghodganga AGM Controversy: ‘घोडगंगा’च्या सभेत घोषणाबाजीने गोंधळ

Illegal Water Extraction: तलाव आटले, तरीही अवैध पाणीउपसा सुरू

Farmers Protest: २३ सप्टेंबरला मंत्र्यांना काजू, बदाम पाठवून राज्यभर आंदोलन, किसान सभेची घोषणा

SCROLL FOR NEXT