फळे-भाजीपाला निर्यातीत महाराष्ट्र बनले भारताची पंढरी
फळे-भाजीपाला निर्यातीत महाराष्ट्र बनले भारताची पंढरी 
ॲग्रो विशेष

Magnet Project : ‘मॅग्नेट’अंतर्गत निवडीसाठी १० ऑक्टोबरपर्यंत अर्ज करा

Team Agrowon

ॲग्रोवन वृत्तसेवा

कोल्हापूर : मॅग्नेट प्रकल्पाच्या (Magnet Project) तिसऱ्या टप्प्यात शेतकरी उत्पादक संस्था, (Farmer Producer Company) मा.वि.म. स्थापित लोकसंचलित साधन केंद्र, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जिवनोन्नती अभियानाअंतर्गत स्थापित प्रभाग संघ, उत्पादकांच्या सहकारी संस्था, प्रक्रियादार, निर्यातदार, ॲग्रिगेटर, मध्यम व मोठ्या रिटेल विक्री संस्था, कृषी तंत्र वा आर्थिक तंत्र संस्थांनी १० ऑक्टोबर सायंकाळी ५ पर्यंत ऑनलाइन अर्ज करावेत, असे आवाहन कृषी पणन मंडळाचे उप सरव्यवस्थापक सुभाष घुले यांनी केले.

पात्र अर्जांचे मूल्यांकन करून मूल्यांकन निकषानुसार पहिल्या ६० लाभार्थ्यांची दुसऱ्या टप्प्यात निवड करण्यात येणार आहे. यामध्ये ४० शेतकरी उत्पादक संस्था व २४ मूल्य साखळी गुंतवणूकदार यांची निवड करण्यात येणार आहे. राज्यातील फळे, भाजीपाला व फुलांच्या उत्पादनावर प्रक्रियेसह विपणन आणि निर्यातीला चालना देण्यासाठी राज्यात मॅग्नेट प्रकल्प कार्यान्वित असून उत्पादन ते ग्राहक अशा एकात्मिक मूल्य साखळ्यांच्या विकासासाठी या प्रकल्पाची आखणी केली आहे. मॅग्नेट प्रकल्पाची अंमलबजावणी राज्यात महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळामार्फत करण्यात येत आहे.

प्रकल्पाअंतर्गत विभागातून पहिल्या टप्यात ४ शेतकरी उत्पादक कंपन्या आणि एका सहकारी संस्थेची निवड करण्यात आली आहे. पात्र लाभार्थ्यांना प्रकल्प खर्चाच्या अधिकतम ६० टक्क्यांपर्यंत अर्थसाह्य देण्यात येणार आहे. हा प्रकल्प १ हजार ६७ कोटी रुपयांचा असून त्यापैकी ७४६ कोटी रु. (७० टक्के) आशियाई विकास बँकेकडून कर्ज स्वरूपात असणार आहेत. उर्वरित ३० टक्के रक्कम ३२१ कोटी रुपये राज्य शासनाचा स्वनिधी असणार आहे.

कोल्हापूर विभागातील डाळिंब, केळी, स्ट्रॉबेरी, भेंडी, मिरची (हिरवी व लाल), फुलपिके इ. पिकांचा मॅग्नेट प्रकल्पात समावेश आहे. प्रकल्पाचा कालावधी सहा वर्षांचा असून २०२६-२७ पर्यंत हा प्रकल्प राज्यात राबविण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाच्या संकेतस्थळावर अर्जासाठी लिंक देण्यात आली आहे. अर्ज सादर करण्यासाठीचा नमुना www.msamb.com या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Water Storage : मराठवाड्यातील उपयुक्त पाणीसाठा ७ ते ८ टक्क्यांवर

Green Hydrogen Project : हिमाचल प्रदेशच्या झाकरीत देशातील पहिला हरित हायड्रोजन प्रकल्प

Sustainable food : कार्बन फूटप्रिंट की शाश्‍वत अन्न?

Mumbai APMC Scam : संजय पानसरे यांना न्यायालयीन कोठडी

Elephant Issue in Germany : हत्तींवरून दोन देशांमध्ये रणकंदन

SCROLL FOR NEXT