Drought Condition Agrowon
ॲग्रो विशेष

Drought Condition : दुष्काळसदृश मंडलांत सवलती लागू करा

Drought Update : दुष्काळसदृश परिस्थिती लागू केलेल्या आठ तालुक्यातील २५ महसुली मंडलांना सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निर्गमित केले आहे.

Team Agrowon

Nanded News : जिल्ह्यातील काही महसूल मंडलांमध्ये जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीत सरासरी पर्जन्याच्या ७५ टक्क्यांपेक्षा कमी व एकूण ७५० मि.मी. पेक्षा कमी पर्जन्यमान झाले आहे, अशा २५ महसुली मंडलामध्ये दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे.

दुष्काळसदृश परिस्थिती लागू केलेल्या आठ तालुक्यातील २५ महसुली मंडलांना सवलती लागू करण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी निर्गमित केले आहे. दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आलेले तालुके व महसूल मंडलामध्ये हदगाव तालुक्यातील निवघा, पिंपरखेड या महसूल मंडलाचा समावेश आहे.

नांदेड तालुक्यातील वजीराबाद, तुप्पा, वसरणी, विष्णुपुरी, तरोडा बु, या मंडलांचा, तर हिमायतनगर तालुक्यातील सरसम, जवळगाव या महसूल मंडलांचा समावेश आहे. नायगाव तालुक्यातील कुंटूर, नायगाव खै., बरबडा या मंडलांचा तर कंधार तालुक्यातील कंधार, कुरुळा, फुलवळ, पेठवडज, उस्माननगर, बारुळ या महसूल मंडलांचा समावेश आहे.

मुखेड तालुक्यातील मुखेड, जांब बु., मुक्रामाबाद तर लोहा तालुक्यातील कापसी (बु.) कलंबर, सोनखेड यांचा, तर देगलूर तालुक्यातील हणेगाव या महसूल मंडलाचा समावेश आहे.

दुष्काळसदृश परिस्थिती घोषित केलेल्या महसूल मंडलातील संबंधित विभागाच्या प्रमुखांनी गावातील खातेदारांना लागू करण्यात आलेल्या सवलती व उपाययोजना देण्याची व्यवस्था करावी.
- अभिजित राऊत, जिल्हाधिकारी, नांदेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT