Crop Competition Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Competition : रब्बी पीक स्पर्धेतील सहभागासाठी ३१ पर्यंत अर्ज सादर करावेत

Agriculture Department : कृषी विभागामार्फत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस या ५ पिकांसाठी पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Team Agrowon

Parbhani News : यंदाच्या (२०२३) रब्बी हंगामापासून पीक स्पर्धा तालुका,जिल्हा व राज्य पातळीवर राबविण्यात येणार आहे.त्यानुसार कृषी विभागामार्फत यंदाच्या रब्बी हंगामामध्ये सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी ज्वारी, गहू, हरभरा, करडई, जवस या ५ पिकांसाठी पिक स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी ३०० रुपये तर आदिवासी गटासाठी १५० प्रवेश शुल्क राहणार आहे.इच्छुक शेतकऱ्यांना या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी रविवार (ता.३१) पर्यंत अर्ज सादर करावेत असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवि हरणे यांनी केले आहे.

या स्पर्धेत भाग घेण्यासाठी शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावे जमीन असणे व ती जमीन तो स्वतः कसत असणे आवश्यक आहे.शेतकऱ्याला एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकासाठी स्पर्धेत भाग घेता येईल. सहभागी लाभार्थीच्या स्वतःच्या शेतावर त्या पिकाखाली किमान ४० आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.

विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ) ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन, ७-१२, ८-अ चा उतारा, जात प्रमाणपत्र (केवळ आदिवासी असल्यास) पिक स्पर्धेसाठी शेतकऱ्याने संबंधित ७-१२ वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा बँक खाते चेक पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत असणे आवश्यक आहे.

पीक स्पर्धेसाठी रविवार (ता.३१) पर्यंत अर्ज दाखल करता येतील आहे. अंतिम मुदतीच्या दिवशी शासकीय सुट्टी असल्यास त्यापुढील शासकीय सुट्टी नसलेली तारीख गृहीत धरण्यात यावी.तालुकास्तर, जिल्हास्तर, राज्यस्तरावरील पिक स्पर्धा निकाल प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांकाचे पिक स्पर्धा विजेते निवडण्यात येतील.

स्पर्धा पातळी सर्वसाधारण व आदिवासी गटासाठी पुढील प्रमाणे बक्षिस स्वरुप असणार आहे.यामध्ये तालुका पातळीवर पहिले बक्षीस ५ हजार रुपये, दुसरे बक्षीस ३ हजार रुपये, तिसरे बक्षीस २ हजार रुपये आहे. जिल्हा पातळीवर पहिले बक्षीस १० हजार रुपये दुसरे ७ हजार हजार रुपये, तिसरे ५ हजार रुपये आहे.

राज्य पातळीवर पहिले बक्षीस ५० हजार,दुसरे बक्षीस ४० हजार,तिसरे बक्षीस ३० हजार रुपये आहे. दुय्यम तसेच पौष्टिक तृणधान्य पिकांच्या क्षेत्रात आणि उत्पादनात वाढ व्हावी याकरीता जास्तीत-जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी व्हावे.पीक स्पर्धेबाबत अधिक माहीतीकरीता शेतकऱ्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा असे आवाहन हरणे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Pulses Procurement Challenges: थेट खरेदीच्या वल्गना

Water Lifting Ban: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यात उद्यापर्यंत उपसाबंदी शिथिल

Farm Loan Waiver: ‘त्या’ शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ; कृषिमंत्री भरणे यांची विधानसभेत माहिती

Monsoon Rain: पुणे जिल्ह्यातील दहा तालुक्यांत पावसाचा जोर

Defective Groundnut Seeds: निकृष्ट भुईमूग बियाणे बदलून मिळणार; कृषिमंत्र्यांच्या निर्देशाने शेतकऱ्यांना दिलासा

SCROLL FOR NEXT