MahaDBT Portal  Agrowon
ॲग्रो विशेष

MahaDBT Portal : ‘महाडीबीटी’वरील अर्जांची नऊ महिन्यांपासून सोडतच नाही

Pending Agricultural Scheme Allocations : गेल्या नऊ महिन्यांपासून सोडतच झाली नसल्याने एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना सोडतीची प्रतीक्षा आहे. सोडत नसल्याने राज्यात प्रतीक्षा असलेल्या अर्जांची संख्या मोठी आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

Ahilyanagar News : शेतकऱ्यांना शेती अवजारांसह विविध योजनांचा लाभ देण्यासाठी ‘महाडीबीटी’वर मागवलेल्या अर्जांचा ओघ सुरू आहे. मात्र गेल्या नऊ महिन्यांपासून सोडतच झाली नसल्याने एकट्या अहिल्यानगर जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकऱ्यांना सोडतीची प्रतीक्षा आहे. सोडत नसल्याने राज्यात प्रतीक्षा असलेल्या अर्जांची संख्या मोठी आहे. शासनाने या योजनांचा निधी अन्यत्र वळविल्याने सोडत होत नसल्याची चर्चा सुरू आहे.

शेतकऱ्यांना वेगवेगळी शेती अवजारांसह बियाणे, खते, ठिबक, तुषार, शेततळ्यासह अन्य सिंचन साधने आदी बाबींचा कृषी विभागाकडून लाभ दिला जातो. कृषी विभागाच्या यांत्रिकीकरण, फलोत्पादन, बियाणे आणि जिल्हा परिषदेच्या विशेष घटक योजनांचा लाभ देण्यासाठी चार वर्षांपासून कृषी विभागाने ‘महाडीबीटी’ पोर्टल विकसित केलेले आहे.

एकाच अर्जावर विविध घटकांच्या योजनांचा लाभ देण्याची सुविधा उपलब्ध करुन दिली. उद्दिष्टापेक्षा अधिक अर्ज आले तर सोडत काढतात. ‘महाडीबीटी’ पोर्टलवर आलेल्या अर्जांची मात्र गेल्या नऊ महिन्यांपासून सोडतच नाहीत. काही महिन्यांपूर्वी अनुसूचित जाती व जमातीच्या लाभार्थ्यांची सोडत काढली, मात्र आचारसंहितेमुळे कार्यारंभ आदेश दिले नाहीत.

इतर अर्जाबाबत मागील फेब्रुवारी महिन्यात ‘महाडीबीटी’ आलेल्या विविध घटक अनुदानासाठीच्या अर्जाची सोडत झाली होती. त्यानंतर अद्याप सोडत झाली नाही, असे सांगितले जात आहे. सध्या नगर जिल्ह्यातील सुमारे ३ लाख ४५ हजार ७६७ अर्जदार शेतकऱ्यांना ‘महाडीबीटी’ वरील मागणी अर्जाची सोडत होण्याची प्रतीक्षा आहे. राज्यभरातील हा आकडा मात्र मोठा आहे.

शासनाकडून विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर विविध वैयक्तिक लाभाच्या योजना जाहीर केल्या. त्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्याने कृषीस अन्य योजनांसाठी निधी कमी पडत असून त्यामुळे ‘महाडीबीटी’ वर शेतकऱ्यांनी केलेल्या अर्जाची सोडत झाली नसल्याची चर्चा सुरू आहे. मात्र कृषी विभागाच्या अवजारे अनुदानासाठी अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना मात्र सोडतीची प्रतीक्षा आहे.

सर्वाधिक मागणी ट्रॅक्टरला

कृषी विभागाकडून शेती अवजारांच्या खरेदीसाठी यांत्रिकीकरणातून अनुदान दिले जाते. त्यात प्रामुख्याने ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळावे अशी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक आहे. शेती मशागतीसाठी बैलकामाचे प्रमाण कमी झाल्याने ट्रॅक्टरला मागणी अधिक असल्याचे सांगितले जात आहे.

एकट्या नगर जिल्ह्यात सध्या मागणी केलेल्या साडेतीन लाख अर्जात केवळ ट्रॅक्टरला अनुदान मिळण्यासाठी १ लाख १८ हजार ६३७ अर्ज सध्या ‘महाडीबीटी’कडे आहेत. ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान मिळावे, अशी मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या अधिक असली तरी लाभ मिळण्याचे प्रमाण कमी आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT