APMC Election Agrowon
ॲग्रो विशेष

Yavatmal Apmc Election : यवतमाळ जिल्ह्यातील १३९ उमेदवारांचे अर्ज बाद

यवतमाळ जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांकरिता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यंदा पहिल्यांदाच या निवडणुकीत कमालीची चुरस दिसत आहे.

Team Agrowon

Yavarmal News : यवतमाळ जिल्ह्यातील १५ बाजार समित्यांकरिता निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. यंदा पहिल्यांदाच या निवडणुकीत कमालीची चुरस दिसत आहे.

छाननीत १५ बाजार समित्यांकरिताचे १३९ अर्ज बाद झाले. आता १६०२ उमेदवार रिंगणात असून, खरे चित्र नामांकन मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजे गुरुवारी (ता. २०) स्पष्ट होणार आहे.

राज्यात शिवसेना ठाकरे आणि शिंदे गटातील राजकारण चांगलेच ताणले गेले आहे. त्याच्याच परिणामी राज्यात कोणतीही मोठी निवडणूक नसतानाही मोर्चे, सभा आंदोलन मोठ्या प्रमाणावर होत आहेत. या माध्यमातून एकमेकांवर तोंडसुख घेण्यातही राजकीय पक्षांनी आघाडी घेतली आहे.

त्यातूनच गंभीर स्वरूपाचे आरोप-प्रत्यारोपही होत आहेत. राज्यस्तरावर अशाप्रकारे वातावरण तापलेले असतानाच जिल्ह्यातही १५ बाजार समित्यांच्या निवडणुकांचा ज्वर वाढीस लागला आहे.

या निवडणुकांसाठी तालुकास्तरावरील राजकीय नेते सक्रिय झाले आहेत. त्यामुळे बाजार समिती निवडणुकांकडे सर्वच लक्ष लावून आहेत. बाजार समिती निवडणुकीकडे जिल्ह्यातील सर्वच पक्ष आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीची रंगीत तालीम म्हणून पाहत आहेत.

त्यामुळे बाजार समितीवर आपल्याच पक्षाचा झेंडा फडकावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे. या निवडणुकीसाठी युती-आघाडीबात बैठकांवर बैठका सुरू आहेत.

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेससह, शिवसेना महाविकास आघाडीला प्राधान्य देत असली तरी बाजार समितीस्तरावर जागावाटपात काय घडते यावर या आघाडीचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. दुसरीकडे भाजपनेही या निवडणुकीत पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला आहे.

३० एप्रिलला मतदान

जिल्ह्यातील यवतमाळ, वणी, नेर, पुसद, बोरीअरब, राळेगाव, महागाव, दिग्रस या बाजार समित्यांसाठी शुक्रवारी (ता. २८), तर मारेगाव, बाभूळगाव, दारव्हा, घाटंजी, झरी, कळंब आणि आर्णी बाजार समितीसाठी रविवारी (ता. ३०) मतदान होणार आहे.

१३९ अर्ज बाद

दारव्हा - ६

बोरीअरब - १०

पुसद - ३२

नेर - ११ 

कळंब - २

वणी - ११

महागाव - १४

झरी जामणी - ३

मारेगाव - १२

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT