Grape Agrowon
ॲग्रो विशेष

Grape Export Registration : अपेडा पोर्टलवर द्राक्षनिर्यातीसाठी नोंदणी करण्याचे आवाहन

APEDA : द्राक्षाच्या उत्पादन आणि निर्यातीत महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सांगलीनंतर सोलापूर जिल्ह्याची आघाडी असते, दरवर्षी युरोपीय देशात इथले शेतकरी द्राक्षांची निर्यात करतात.

Team Agrowon

Solapur News : जिल्ह्यातील द्राक्ष निर्यात करु इच्छिणाऱ्या शेतकऱ्यांसाठी अपेडाच्या पोर्टलवर आगामी हंगामातील द्राक्ष निर्यातीसाठी नोंदणी सुरु झाली असून, शेतकऱ्यांनी नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

द्राक्षाच्या उत्पादन आणि निर्यातीत महाराष्ट्रात नाशिक, पुणे, सांगलीनंतर सोलापूर जिल्ह्याची आघाडी असते, दरवर्षी युरोपीय देशात इथले शेतकरी द्राक्षांची निर्यात करतात.

मागच्यावर्षी एकट्या सोलापूर जिल्ह्यातून जवळपास १२३ कंटेनरमधून द्राक्षाची निर्यात झाली असल्याचे सांगण्यात आले. यंदाही अपेडाच्या पोर्टलवर नोंदणी सुरु झाली असून, येत्या ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत देण्यात आली आहे.

ॲग्रो विशेष

नोंदणीसाठी लागणार ही कागदपत्रे

द्राक्षाच्या नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी मल कृषी अधिकाऱ्याच्या स्वाक्षरीसह अर्ज करावा, त्यासोबत सात-बारा उतारा, आठ अ उतारा आणि ऑक्टोबर महिन्यातील नोंदीसाठी ५० रुपयांचे चलन साधारण १.२० प्रति हेक्टरसाठी, तर नोव्हेंबर ते डिसेंबरसाठी हे चलन १०० रुपये आणि साधारण १.२० प्रतिहेक्टरसाठी भरावे लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Rabi Jowar Seed Scheme: रब्बी ज्वारी मिनीकिटसाठी नोंदणी करा; कृषी विभागाचे आवाहन

Wetland Ecosystems: पाणथळ सृष्टी व्यवस्थेचे विश्व

Interview with Jaykumar Gore: दुष्काळमुक्ती अन् रोजगारनिर्मितीस प्राधान्य

Spider Mite Issue: वांग्यावरील लाल कोळीची समस्या

Microgreen Farming: नेदरलँड्समधील मायक्रोग्रीन शेती

SCROLL FOR NEXT