Rain  Agrowon
ॲग्रो विशेष

Rain Update : पावसाची उघडीपीने चिंता; पिकांना सोडले पाणी

Marathwada Rain : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यातील अनेक मंडळात व मंडळातील काही गावांमध्ये पावसाने १० ते ११ दिवसापासून उघडीप दिली आहे.

Team Agrowon

Chhatrapati Sambhajinagar : मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना व बीड या तीनही जिल्ह्यातील अनेक मंडळात व मंडळातील काही गावांमध्ये पावसाने १० ते ११ दिवसापासून उघडीप दिली आहे. त्यामुळे कोरडवाहू क्षेत्रातील पेरणी केलेल्या शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून पाण्याची उपलब्धता असलेल्यांनी पिकाला पाणी देणे सुरू केले आहे. तर काही ठिकाणी दुबार पेरणी करावी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माहितीनुसार, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात आजवरच्या पावसाळ्यात २.५ मिलिमीटर पेक्षा जास्त पाऊस झाल्यास मोजल्या जाणाऱ्या पावसाचे दिवस ३ ते १२ दरम्यान राहिले आहेत. पैठण तालुक्यातील बिडकीन, निलजगाव मंडळात आत्तापर्यंतच्या पावसाळ्यात सर्वात कमी केवळ तीन दिवस पावसाचे राहिले आहेत. दुसरीकडे छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील चौका कन्नड तालुक्यातील नाचनवेल मंडळातील पावसाचे दिवस ११ मोजले गेले आहेत.

खुलताबाद तालुक्यातील तीनही मंडळात दहा दिवस पावसाचे गणल्या गेले आहेत. जालना जिल्ह्यातील मंठा तालुक्यातील मंठा व ढोकसाळ मंडळात अनुक्रमे ११ व १० दिवस पावसाचे वगळता जिल्ह्यातील इतर मंडळांमध्ये ५ ते ९ दिवस पावसाचे गणल्या गेले आहेत. बीड जिल्ह्यातील बीड तालुक्यातील चौसाळा, नेकनूर, आष्टी तालुक्यातील धानोरा, गेवराई तालुक्यातील सिरसदेवी, माजलगाव तालुक्यातील नित्रुड तर शिरूर कासार तालुक्यातील रायमोह व तिंतरवणी मंडळात पावसाचे दिवस प्रत्येकी ११ गणल्या गेले आहेत.

शिवाय शिरूर कासार तालुक्यातील शिरूर कासार, वडवणी तालुक्यातील वडगाव, पाटोदा तालुक्यातील अमळनेर व पाटोदा या मंडळांमध्ये आजवर पावसाचे प्रत्येकी १२ दिवस गणल्या गेले आहेत. इतर मंडळांमध्ये ५ ते ९ दिवसापर्यंत पावसाचे दिवस गणल्या गेले आहेत. मंडळावर पाऊस गणल्या गेला असला तरी मंडळातील सहभागी गावांमध्ये पावसाच्या प्रमाणात तफावत असल्याची स्थिती आहे.

दहा दिवसांपेक्षा जास्त पडलेल्या पावसाच्या खंडामुळे कोरडवाहू भागात हलक्या जमिनीतील पिकांनी काही ठिकाणी माना टाकायला सुरवात केली आहे. चार-पाच दिवस पावसाने आणखी उघडीप दिल्यास नुकत्याच उगवण झालेल्या पिकांना असलेला धोका वाढणार हे स्पष्ट आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे पाणी उपलब्ध आहे त्यांनी आपल्या पिकांना पाणी देणे सुरू केले आहे.

मंडलनिहाय पाऊस

शुक्रवारी (ता. २१) सकाळपर्यंतच्या २४ तासात बीड जिल्ह्यातील ३४ मंडळात पाऊस झाला. त्यापैकी चौसाळा मंडळात ६ मिलिमीटर, लिंबागणेश ४, पाटोदा ४.५, दासखेड ८, थेरला ३.५, अमळनेर ४.५, कडा सहा मादळमोही ३.८, सिरसदेवी २१.८, गंगामसला १६.५, हनुमंत पिंपरी २.८, केज २.८, शिरूर कासार ४.३, तिंतरवणी १७ मिलिमीटर इतका दखलपात्र पाऊस झाला. इतर मंडळातील पावसाची हजेरी तुरळक राहिली.

जालना जिल्ह्यातील २१ मंडळात पावसाची हजेरी लागली. त्यापैकी सिपोरा मंडळात १७.५ मिलिमीटर, जाफराबाद ६.८, माहोरा १७.५, कुंभारझरी ८.५, टेंभुर्णी ६.८, वरुड बुद्रुक २२, जालना ग्रामीण २.५, शेवली ६.३, बावणे पांगरी ३.३ मिलिमीटर इतका दखलपात्र पाऊस झाला. इतर मंडळातील पावसाची हजेरी तुरळक राहिली.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ८३ पैकी ३० मंडळात पावसाची हजेरी लागली. त्यापैकी छत्रपती संभाजीनगर मंडळात १८.५ मिलिमीटर तर भावसिंगपुरा २१.५ चिकलठाणा १४.८ करमाड ३ पैठण पाच नाचनवेल ३.५ वेरूळ ५.५ बाजार सावंगी मंडळात ५.५ मिलिमीटर इतका दखलपात्र पाऊस झाला. उर्वरित मंडळातील पाऊस तुरळक राहिला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Election Result 2024 Live : शेतकऱ्यांची नाराजी निवडणुकीत का उमटली नाही?

Tur Cultivation : बांधावरील तूर ठरतेय वरदान

Sugarcane Season 2024 : आपल्या कामाने ‘आष्टीशुगर’आघाडीवर राहील

Paddy Threshing : विक्रमगडमध्ये पारंपरिक भातमळणी

Wild Animal Attack : दोन दिवसांत दोन शेळ्यांवर बिबट्यासदृश प्राण्याचा हल्ला

SCROLL FOR NEXT