Installment Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Loan Installment : कर्जफेडीसाठी आता तिमाहीऐवजी वार्षिक हप्ता

Pargaon Society Co-operative Bank : पारगाव सोसायटीने जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात यांच्याकडे कर्जाचा हप्ता तिमाहीऐवजी वार्षिक करावा, अशी लेखी स्वरूपात मागणी केली.

Team Agrowon

Pune News : पारगाव सोसायटीने जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात यांच्याकडे कर्जाचा हप्ता तिमाहीऐवजी वार्षिक करावा, अशी लेखी स्वरूपात मागणी केली. थोरात यांनी ही मागणी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या मासिक सभेमध्ये जिल्हा बँकेचे अध्यक्ष दिगांबर दुर्गाडे व संचालक मंडळाला पटवून दिली.

याबाबत संचालक मंडळाने सकारात्मक भूमिका घेऊन तिमाही ऐवजी वार्षिक हप्ता करण्यास मान्यता दिली. या निर्णयामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या वार्षिक उत्पन्नातून सदर कर्ज परत फेड करणे सहज शक्य होणार आहे.

पुणे जिल्हा बँकेच्या या निर्णयाचे शेतकऱ्यांसह सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. बँकेनी नुकतीच शेतकऱ्यांसाठी बळीराजा कर्ज योजना सुरू केली होती. या योजनेतर्गत शेतकऱ्यांना पीक कर्जा व्यतिरिक्त एकरी दीड लाख व जास्तीतजास्त सात लाख मध्यम मुदत कर्ज दिले जाते.

या योजनेचा गरजू शेतकऱ्यांना निश्चित फायदा होणार आहे, परंतु सदर योजनेत कर्ज परतफेड तिमाही हप्त्याने असल्यामुळे शेतकऱ्यामध्ये नाराजीचा सूर होता. कारण शेतकऱ्यांकडे शेती पिकाचे पैसे वर्षातून एकदा येत असतात.

त्यामुळे दर ३ महिन्यांनी हप्ते भरणे शक्य नसते. पारगाव सोसायटीचे चेअरमन तुकाराम ताकवणे यांनी जिल्हा बॅकेच्या संचालक मंडळाचे याबद्दल अभिनंदन केले आहे. या सदर्भात जिल्हा बँकेचे संचालक रमेश थोरात म्हणाले की, पारगाव येथील शेतकऱ्यांची मागणी रास्त होती या मागणीचा विचार करून आम्ही वरील निर्णय घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Illegal Money Lending Act: अवैध सावकारीला आळा घालू; सहकारमंत्री बाबासाहेब पाटलांची कायद्यात बदल करण्याची घोषणा

Maharashtra Rain Forecast: राज्यात वादळी पावसाचा अंदाज

Maharashtra Heavy Rain: कोकणात पावसाचा धुमाकूळ; राज्यात जोर कायम

Mango Festival: अमेरिकेला भारतीय आंब्यांची गोडी

Farm Loan Waiver: शेतकऱ्यांना कर्जमाफी ५ जुलैनंतरच, अटी, निकषांमध्ये बदल, कृषिमंत्री भरणेंची विधानसभेत घोषणा

SCROLL FOR NEXT