Crop Loan Agrowon
ॲग्रो विशेष

Crop Loan : पीककर्ज काढताना आता ५०० च्या स्टॅंपपासून मुक्ती

Stamp Duty For Loan : राज्यातील शेतकऱ्यांना १ लाख, ६० हजार रुपयांपर्यंत कर्जासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : राज्यातील शेतकऱ्यांना १ लाख, ६० हजार रुपयांपर्यंत कर्जासाठी मुद्रांक शुल्क माफ करण्याची घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नुकतीच केली. संबंधित बॅंकांना त्यांनी तसे आदेश दिले असून आता शेतकऱ्यांना ५०० च्या स्टॅंपऐवजी एक रुपयाच्या तिकिटावर शेतकऱ्यांना कर्ज मिळणार आहे.

नव्याने पीक कर्ज घ्यायचे असल्यास अनेक शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्काचा अतिरिक्त भार सोसावा लागत होता. शेतकऱ्यांना किमान ५०० रुपयांचे मुद्रांक शुल्क घेऊन नव्याने पीक कर्ज घ्यायचे असल्यास संबंधित बॅंक शाखेत अर्ज करावा लागायचा.

मात्र, मुख्यमंत्र्यांनी मुद्रांक शुल्क माफ केल्यानंतर अनेक शेतकरी अंमलबजावणीची वाट पाहात होते. अखेर संबंधित बॅंक शाखांना तसे आदेश देण्यात आले आहे.

नव्याने पीक कर्ज घेताना १ लाख ६० हजार रुपयांपर्यंतच्या पीक कर्जाला लागणारे मुद्रांक शुल्क भरावे लागणार नसल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना होईल.

राज्यातील शेतकऱ्यांना १ लाख ६० हजारांच्या कर्जावर मुद्रांक शुल्क माफीची घोषणा सरकारने केली. यासंदर्भात १ एप्रिल २०२४ पासून नव्याने पीक कर्ज घेणाऱ्यांना मुद्रांक शुल्क माफ झाले. आता कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्यांना मुद्रांक शुल्क भरावे लागणार नाही. केवळ एक रुपयाच्या रेव्हनी तिकिटावर पीक कर्ज दिले जाईल. तसे आदेश बॅंकांना मिळाले आहेत.
- विकास गोलांडे, शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ इंडिया, केळवद, जि. नागपूर.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kharif Crop Crisis: पिके करपली खरीप अडचणीत

Sugar Stock Verification: साखर साठ्याची संयुक्त तपासणी

Agriculture Department: ‘कृषी’तील आस्थापना सेवांना दिरंगाई नको

September Rainfall: सप्टेंबरमध्येही पाऊस कमीच

Sugar Sales Quota: पंधरवड्यासाठी तेरा लाख टन साखर कोटा निश्‍चित

SCROLL FOR NEXT