Animal Husbandry Department agrowon
ॲग्रो विशेष

Animal Husbandry Department : दिड लाख जनावरांना वंध्यत्वाचा त्रास, पशुसंवर्धन विभागाचे लसीकरणासाठी आवाहन

Kolhapur Animal Husbandry Department : कोल्हापूर पशुसंवर्धन विभागातर्फे शासकीय पशुवैद्यक वंध्यत्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

sandeep Shirguppe

Kolhapur Agriculture News : कोल्हापूर जिल्ह्यातील पाच लाख दुभत्या जनावरांपैकी जवळपास दिड लाख जनावरांना वंध्यत्वाचा त्रास असल्याची माहिती समोर आली आहे. अशा जनावरांना वेळीच लसीकरण, क्षारयुक्त आहार देण्यातून वंध्यत्वाचा धोका कमी करण्याचे काम होणार आहे.

याबाबत पशुसंवर्धन विभागातर्फे शासकीय पशुवैद्यक वंध्यत्व तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात अत्यंत कमी शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवल्याने जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आपल्या जनावरांची तपासणी करण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाकडून करण्यात येत आहे.

दुभत्या जनावरात म्हैशी, गायी अशा जनावरांचे संगोपन होते. यातून संबंधित शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर पडते. मात्र, असे दुभते जनावर वेळीच गाभण जायला हवे. यासाठी म्हैशींना पुरेसे क्षारयुक्त आहार न देताच ठराविक प्रकारचा चारा दिल्याने त्या जनावरांचे पोषण योग्यप्रकारे होत नाही, विशिष्ट क्षार कमी पडल्याने जनावरांच्या प्रकृतीवर विपरित परिणाम होऊन वंध्यत्वाचा धोका निर्माण होतो.

यातही ७० ते ९५ टक्के जनावरांना तात्पुरत्या स्वरूपाचे वंध्यत्व असते तर उर्वरित जनावरांना कायमस्वरूपी वंध्यत्व असते. तात्पुरत्या स्वरूपातील वंध्यत्वावर वेळीच उपचार केले; तसेच क्षारयुक्त आहार दिल्यास वंध्यत्वाची समस्या दूर होऊ शकते. मात्र, अनेक कारणाने यात अनियमितता होते. त्यातून जनावर कायमस्वरूपी वंध्यत्व झाल्यास पशु धनवाढीस व उत्पादनाला फटका बसतो.

अनेकदा जनावराला डॉक्टरांकडे तापासणी नेण्याऐवजी घरगुती उपाय केले जाताते. यात वेळ जातो. कालवड २४ महिन्यांत तर रेडी ३६ महिन्यांत गाभण जाणे महत्त्वाचे आहे. हा कालावधी ओलांडून बरेच दिवस झाले तर जनावरांसाठी धोकादायक ठरू शकते.

जनावरांना कायमस्वरूपी की तात्पुरत्या स्वरूपाचे वंध्यत्व आहे हे तपासून वैद्यकीय उपाययोजना करण्यासाठी गावोगावी शिबिर घेण्यात येत आहे. या शिबिरात जनावर मालकांनी जनावरे तपासून डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. यासाठी पशुसंवर्धन विभागाच्या डॉक्टरांची नियुक्ती झाली असून, वेळीच जनावरांवर उपचार झाल्यास कायमस्वरूपी वंध्यत्वाचा धोका टाळता येणे शक्य होणार आहे. डॉ. सॅम लुड्रिक्स, पशुसंवर्धन अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Payment: उसाचा १०० रुपये दुसरा हप्ता तातडीने जमा करा अन्यथा आंदोलन, 'स्वाभिमानी'चा कारखान्यांना इशारा

Parbhani Dam Water Update: परभणी जिल्ह्यातील लघु प्रकल्पांत ११, मध्यम प्रकल्पांत ९ टक्के पाणीसाठा

Turmeric Farmers Support: हळदीला विमा संरक्षणाने शेतकऱ्यांना दिलासा

Fertilizer Dealers Complaint: खत विक्रीत लिंकिंगचा आरोप

Women Farmers: ‘वसंधुरा’च्या महिलांकडून सायकल कोळप्याने कोळपणी

SCROLL FOR NEXT