Animal Husbandry Department  Agrowon
ॲग्रो विशेष

Department Of Animal Husbandry : ‘पशुवैद्यकीय’च्या भिंती होणार बोलक्या

Veterinary Clinic : शाळांमध्ये ‘बोलक्या भिंती’ करण्यात आल्या, त्याचा विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेसाठी चांगला फायदा झाला. आता त्याच धर्तीवर जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाने दवाखान्यांच्या भिंतीही बोलक्या करण्यात येणार आहेत.

Team Agrowon

Pune News : शाळांमध्ये ‘बोलक्या भिंती’ करण्यात आल्या, त्याचा विद्यार्थ्यांच्या आकलन क्षमतेसाठी चांगला फायदा झाला. आता त्याच धर्तीवर जिल्ह्यातील पशुसंवर्धन विभागाने दवाखान्यांच्या भिंतीही बोलक्या करण्यात येणार आहेत.

सध्या लोकसहभागातून आठ दवाखान्यांमध्ये ‘बोलक्या भिंती’ करण्यात आल्या असून, सर्वच दवाखान्यांमध्ये हा उपक्रम लोकसहभागातून करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांनी दिली.

जिल्ह्यामध्ये पशुसंवर्धन विभागाचे २८८ ठिकाणी दवाखाने आहेत. यामाध्यमातून पशूंच्या आजाराचे निदान करून उपचार केले जातात. नियमित लसीकरणाबरोबरच आपत्कालीन परिस्थितीमध्ये आलेल्या रोगांचा प्रादुर्भाव रोखण्याचे काम केले जाते.

दवाखान्यात येणाऱ्या पशुपालकांमध्ये जनजागृती होण्यासाठी तसेच विविध आजारांची माहिती, त्याची लक्षणे, प्राथमिक उपचार याबद्दल माहिती दवाखान्यांच्या भिंतीवर विविध रंगसंगती करून लिहिण्यात येणार आहे. बांधकाम, दुरुस्तीसाठी हवे सत्तावीस कोटी

जिल्ह्यातील २८८ पैकी ३१ दवाखान्यांच्या इमारती या नव्याने बांधण्याची आवश्यकता आहे. तर २६ दवाखाने हे खासगी जागेवर सुरू आहेत. अद्याप त्यांना हक्काची जागा उपलब्ध नाही. जवळपास सव्वाशे दवाखान्यांच्या इमारतींना दुरुस्तीची गरज आहे.

बोलक्या भिंती केल्याने पशुपालकांना विविध आजारांची सहज माहिती होणार आहे. याशिवाय दवाखान्यांमध्ये विविध विषयांची माहितीपर पुस्तके ही उपलब्ध करून देण्याचे विचाराधीन आहे. भिंतीवर विविध घोषवाक्ये, विविध पशूंची चित्रे त्याचबरोबर आजाराची माहिती देणारा मजकूर लिहिला जाणार आहे.
- डॉ. विष्णू गर्जे, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT