Jal Jivan Mission Agrowon
ॲग्रो विशेष

Jal Jivan Mission : कोट्यवधींचा खर्च तरीही पाण्यावाचून गावकरी त्रस्त

Rural Water Supply Scheme : शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील नागरिकांना वैयक्तिक घरगुती नळजोडणीद्वारे सुरक्षित, पुरेसे व गुणवत्तापूर्ण पाणी देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जल जीवन मिशनच्या जालना तालुक्यात एकूण ८९ योजना आहेत.

Team Agrowon

Jalna News : गावांना नियमित स्वच्छ व गुणवत्तापूर्ण पाणी देण्याच्या उद्देशाने कोट्यवधी रुपये खर्च करून राबविण्यात येत असलेल्या जल जीवन मिशन योजनेच्या कामात ग्रामपंचायतीला विश्वासात न घेता काम सुरू करणे, कंत्राटदाराकडून कामात होत असलेली दिरंगाई, कामासाठी अधिकाऱ्यांची ठरलेली टक्केवारी अशा विविध तक्रारींचा पाढाच जालना तालुक्यातील सरपंचांनी शनिवारी (ता. आठ) आढावा बैठकीत वाचला.

आमदार अर्जुन खोतकर यांच्या उपस्थित जालना तालुक्यातील जल जीवन मिशन योजनेच्या कामाची आढावा बैठक पंचायत समितीच्या सभागृहात पार पडली.

यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता विद्या कानडे, गटविकास अधिकारी संदीप पवार, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख भाऊसाहेब घुगे, संपर्कप्रमुख पंडित भुतेकर, युवासेनेचे सचिव अभिमन्यू खोतकर यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.

शहरी भागाप्रमाणेच ग्रामीण भागातील नागरिकांना वैयक्तिक घरगुती नळजोडणीद्वारे सुरक्षित, पुरेसे व गुणवत्तापूर्ण पाणी देण्यासाठी राबविण्यात येत असलेल्या जल जीवन मिशनच्या जालना तालुक्यात एकूण ८९ योजना आहेत.

यापैकी ३२ योजना पूर्ण झाल्या असून ५८ योजनेचे काम सध्या सुरू आहे. दरम्यान, दिलेल्या मुदतीत काम संपणे अपेक्षित असतानाही अनेक कंत्राटदाराकडून कामात दिरंगाई होत आहे. यामुळे काही गावात विहीर, पाइपलाइन आणि टाकीची कामे खोळंबली आहेत. या योजनेच्या कामाची जबाबदारी असलेल्या वॅपकॉस कंपनीच्या अधिकाऱ्यांकडून सरपंच, ग्रामसेवक यांना विचारात न घेताच परस्पर कामे सुरू आहेत.

त्यांचा कंत्राटदाराच्या मदतीने मनमानी कारभार सुरू आहे. अशा तक्रारीच सरपंचांनी या बैठकीत मांडल्या आहेत. दरम्यान, सरकार या योजनेवर कोटी रुपये खर्च करूनही गावकऱ्यांना पाणी मिळत नसल्याने सरपंच आक्रमक झाले होते. त्यामुळे आमदार खोतकर यांनी वॅपकॉस कंपनीच्या अधिकाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Rain Prediction: पूर्व विदर्भात ५ दिवस पावसाचा अंदाज; उद्यापासून राज्यात पावसाचे वातावणर निवळण्याची शक्यता

Unseasonal Rain Crisis: वादळी पावसाचा तिसऱ्यांदा तडाखा

Turmeric Harvest Management: हळद काढणी पश्चात व्यवस्थापनावर मार्गदर्शन

Farmer Compensation Maharashtra : राज्यात २ लाख ४ हजार हेक्टर शेतीपिकांचं नुकसान; शेतकऱ्यांना लवकरात-लवकर मदत देणार, कृषिमंत्री भरणे यांची ग्वाही

Fertilizer Stock Approved: अकोला जिल्ह्यासाठी १.१४ लाख टन खत मंजूर

SCROLL FOR NEXT