Pune News : आणे पठार परिसरातील विविध गावांचा कुकडी प्रकल्पाच्या चौथ्या फेरजलनियोजनात समावेश करावा, या मागणीसाठी गेल्या १५ दिवसांपासून (ता. १६) पासून सुरू असलेले उपोषण, धरणे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे. कुकडी प्रकल्पाचे मुख्यअभियंता डॉ. हेमंत धुमाळ यांच्या सकारात्मक आश्वासनानंतर बुधवारी (ता.२९) हे आंदोलन मागे घेण्यात आले.
पुणे येथे सिंचन भवनात बुधवारी (ता. २९) आंदोलकांच्या शिष्टमंडळाची डॉ.धुमाळ यांच्याशी बैठक झाली. या वेळी त्यांच्याकडून आणे पठारावरील गावांचा कुकडी प्रकल्पात समवेश करण्याच्या मागणीबाबत सकारात्मक आश्वासन मिळाल्याने बेमुदत उपोषण, आंदोलन मागे घेत असल्याचे आंदोलनकर्त्यांकडून जाहीर करण्यात आले. मधुकर दाते व संचालक मुक्ता दाते यांनी उपोषण सुरू केले होते. आणे येथील पठार विकास संस्थेचे कार्याध्यक्ष मधुकर दाते यांनी ही माहिती दिली.
आणे येथे श्री रंगदास स्वामी महाराज मंदिराच्या प्रांगणात आणे पठार विकास संस्थेद्वारे आणे पठारावरील आणे, नळवणे, शिंदेवाडी, पेमदरा आदी गावांच्या शेतीच्या सिंचनासाठी कुकडीतून उपसासिंचन योजना राबविण्यासाठी या गावांचा कुकडी प्रकल्पाच्या चौथ्या ‘सुप्रमा’मध्ये फेरजलनियोजनात समावेश करावा, अशी आंदोलकांची मागणी आहे.
शुक्रवारी (ता. २४)आणे येथे जुन्नरचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांच्यासह कुकडी प्रकल्पाच्या डिंभे धरण विभागाचे उपकार्यकारी अभियंता सुनील देवरे, उपविभागीय अधिकारी विलास हांडे, आळेफाटा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक यशवंत नलावडे यांनी आंदोलनस्थळी प्रत्यक्ष भेट देऊन संबंधितांशी चर्चा केली होती.
आणे पठार भागातील शेतकऱ्यांची पाण्याची गरज लक्षात घेऊन भविष्यात कुकडीच्या होणाऱ्या जलनियोजनात इतर योजनांबरोबरच, आणे पठारभागासाठी उपसा जलसिंचन योजनेचा निश्चितपणे समावेश करण्यात येईल.- डॉ. हेमंत धुमाळ, कुकडी प्रकल्पाचे मुख्य अभियंता.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.