Uday Samant Agrowon
ॲग्रो विशेष

Minister Uday Samant : उद्योगमित्र बैठक दर आठवड्याला घेण्याचा अध्यादेश काढणार

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रीकल्चरतर्फे राजे संभाजी नाट्यगृहात झालेल्या जळगाव जिल्हा विकास परिषदेत ते बोलत होते.

Team Agrowon

Jalgaon News : औद्योगिक वसाहतींचे प्रश्‍न वेगळे आहेत. त्या प्रत्येक प्रश्‍नावर काम करण्याची प्रक्रिया सुरू आहे. उद्योगमित्र बैठक नियमित होण्याने बऱ्याच समस्या सुटू शकतात.

त्यामुळे दर आठवड्याला ही बैठक व्हावी, म्हणून अध्यादेश काढू, अशी ग्वाही राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत (Minister Uday Samant) यांनी दिली.

महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स इंडस्ट्री ॲन्ड ॲग्रीकल्चरतर्फे राजे संभाजी नाट्यगृहात झालेल्या जळगाव जिल्हा विकास परिषदेत ते बोलत होते.

व्यासपीठावर आमदार सुरेश भोळे, संजय सावकारे, चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी, जैन इरिगेशचे संचालक अतुल जैन, परिषदेच्या प्रोजेक्ट चेअर पर्सन संगीता पाटील, भरत अमळकर आदी उपस्थित होते.

जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाठी दिशा ठरविणाऱ्या परिषदेत जळगाव जिल्ह्याच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि कृषिक्षेत्रातील विकासासंबंधी मंथन झाले. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन झाले.

नवीन उद्योगांसाठी एक खिडकी योजना

परिषदेत मार्गदर्शन करताना श्री. सामंत म्हणाले, की उद्योजकांना नवीन उद्योग सुरू करताना येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी एक खिडकी योजना सुरू करण्यात आली आहे.

तसेच प्रत्येक एमआयडीसीत स्वत:चे फायर स्टेशनबरोबरच कामगार रुग्णालय उभारण्यात येईल. जिल्ह्यात केळीपासून धागा व कापडनिर्मिती करणारे उद्योग सुरू करण्याची तयारी काही उद्योजकांनी दर्शविल्याचे ते म्हणाले.

‘जळगाव प्रथम’ हा विचार व्हावा : जैन

जळगावच्या विकासासाठी इथली मंडळी संघटित नाही. आपणच आपल्या विकासविषयक स्थितीला कारणीभूत आहोत. विमानतळ असूनही सेवा नाही. पोटेंशिअल असूनही केवळ व्हीजन नसल्याने जळगावचा विकास होत नाही.

यासंदर्भात सर्व समस्या व प्रश्‍न मुख्यमंत्र्यांसमोर बैठकीत मांडण्यात येतील, अशी भूमिका जैन इरिगेशनचे संचालक अतुल जैन यांनी परिषदेत मांडली. किरण बच्छाव, श्‍यामसुंदर अग्रवाल, महेंद्र रायसोनी यांनी उद्योगांसंदर्भात समस्या मांडल्या.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmer Training: पवारवाडीत महिलांना शेतीविषयक धडे

Farmers Protest: ऊस बिलासाठी म्हेत्रेंच्या घरासमोर बेमुदत उपोषण सुरू

Ahilyanagar Zilla Parishad: अहिल्यानगरला ३८ महिलांना मिळणार जिल्हा परिषदेत संधी

Solapur Zilla Parishad: विजय डोंगरे, उमेश पाटलांना संधी, साठेंची अडचण वाढली

Crop Protection: कीड-रोगावर नियंत्रणासाठी पीक निरीक्षणाची गरज 

SCROLL FOR NEXT