Agriculture University Agrowon
ॲग्रो विशेष

Agriculture University : कृषी विद्यापीठाने साकारले अभिनव विक्री केंद्र

Agriculture Sale Center : कृषी विद्यापीठाने रामदासपेठ परिसरात उभारलेल्या विक्री केंद्राची कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी पाहणी केली. यावेळी प्रकाश कडू, विलास अतकरे यांच्यासह कर्मचारी, अधिकारी उपस्थित होते.

विनोद इंगोले : ॲग्रोवन वृत्तसेवा

Nagpur News : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने विकसित तंत्रज्ञानाचा प्रसार, प्रचार होत ते सहज उपलब्ध व्हावे याकरिता विदर्भात सर्वदूर विक्री केंद्राची अभिनव संकल्पना मांडली आहे. नागपुरातील या केंद्राचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांच्या हस्ते उद्घाटन झाले. जानेवारीपासून सुरू झालेल्या या केंद्राच्या माध्यमातून तीन कोटी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा गाठण्यात आला आहे.

('ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

नागपूर दौऱ्यात संवाद साधताना कुलगुरू डॉ. गडाख म्हणाले, ‘‘भारतीय कृषी संशोधन परिषदेने विद्यापीठांसाठी असलेल्या बजेट तरतुदीपैकी ३० टक्‍के उत्पन्न स्वनिधीतून उभारावे, अशी संकल्पना मांडली आहे. आयसीआरच्या याच संकल्पनेवर काम करण्यासाठी पीडीकेव्हीकडून पुढाकार घेण्यात आला आहे.

कृषी विद्यापीठाकडे उपलब्ध तंत्रज्ञानाच्या प्रसाराचाही उद्देश साध्य होणार आहे. असे दुहेरी उद्दिष्ट विक्री केंद्राद्वारे साधले जाणार आहे. २६ जानेवारी २०२३ पासून विदर्भातील ११ प्रादेशिक संशोधन केंद्राच्या परिसरात उभारण्यात आलेल्या या केंद्रातून बियाणे, सूक्ष्म अन्नद्रव्ये, प्रकाशन साहित्य, यंत्र तसेच इतर उत्पादने विकली जातात.

त्या माध्यमातून अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीत तीन कोटी रुपयांची उलाढाल साध्य झाली आहे. विक्री केंद्राचे व्यवस्थापन सहयोगी अधिष्ठाता प्रकाश कडू व विलास अतकरे यांच्या मार्गदर्शनात होत आहे. रामदास पेठ परिसरात उभारलेल्या या विक्री केंद्राच्या माध्यमातून कृषी विद्यापीठ अंतर्गत असलेल्या दुग्धविकास शाळेतील दूध व दुग्धजन्य पदार्थांची विक्री होते. ही बाब हेरत विद्यापीठ, ७ केव्हीके, आठ तंत्र महाविद्यालयाच्या प्रक्षेत्रावर एक एकरावर तुती लागवड करून व्यावसायिक रेशीम कोश उत्पादनावर भर दिला जाणार आहे.

शेतकऱ्यांशी संबंध वाढावा या उद्देशाने उभारलेल्या विक्री केंद्राला चांगला प्रतिसाद मिळाला असून ९ महिन्यांत तीन कोटी रुपयांच्या उलाढालीचा टप्पा गाठता आला आहे. येत्या काळात वर्मी वॉश, गांडूळ खत उपलब्ध करून देणार असून त्याकरिता पीडीकेव्ही अर्थ गोल्ड ब्रॅण्ड विकसित केला आहे.
डॉ. शरद गडाख, कुलगुरू, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT