R. S. Sodhi Agrowon
ॲग्रो विशेष

Indian Dairy Association: आयडीएच्या अध्यक्षपदी आर.एस. सोढी

सोढी सध्या अमूल या ब्रॅंडनेमने ख्यातनाम असलेल्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड (GCMMF) या १८ सदस्यीय संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत.

Team Agrowon

अमूल फेडरेशनचे व्यवस्थापकीय संचालक आर. एस. सोढी (R. S. Sodhi) यांची इंडियन डेअरी असोसिएशनचे (IDA-आयडीए) अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. आयडीए (IDA) ही देशभरातील डेअरी उद्योग क्षेत्रातील सर्वोच्च संघटना आहे. १९४८ साली या संघटनेची स्थापना झाली.

डेअरी क्षेत्रातील सहकारी, बहुराष्ट्रीय ,खाजगी संस्था, डेअरीविषयक संशोधन व शैक्षणिक संस्था तसेच या क्षेत्रातील सार्वजनिक मालकीच्या व खाजगी केंद्रांचे प्रतिनिधी या संस्थेचे सदस्य आहेत.
सोढी सध्या अमूल या ब्रॅंडनेमने ख्यातनाम असलेल्या गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेड (GCMMF) या १८ सदस्यीय संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक आहेत. तसेच ते बोर्ड ऑफ इंटरनॅशनल डेअरी फेडरेशनचेही (IDF) सदस्य आहेत.

सोढी यांना डेअरी क्षेत्रातील ४० वर्षांचा अनुभव असून मागच्या १२ वर्षांपासून ते गुजरात कोऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन लिमिटेडचे (GCMMF) नेतृत्व करत आहेत.आयडीएचे (IDA) प्रतिनिधीत्व करण्याची संधी हा माझ्यासाठी मोठा बहुमान असल्याची प्रतिक्रिया निवडीनंतर सोढी यांनी व्यक्त केली.

माझे मार्गदर्शक डॉ. व्हर्गीस कुरियन (Dr. Varghese Kurien) यांनी १९६४ साली आयडीएचे (IDA) नेतृत्व केले होते. त्यानंतर ५८ वर्षांनंतर ही संधी मला मिळत असल्याचे ते म्हणाले. भारतातील दुग्ध व्यवसाय हे क्षेत्र आत्मनिर्भर असून या व्यवसायाकडे जगाचा दुग्ध व्यवसाय बनण्याची क्षमता असल्याचा विश्वासही सोढी यांनी व्यक्त केला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers Contribution: मोरोक्कोच्या बहरलेल्या शेतीतील अदृश्य हात

Interview With Rakesh Kaithwas : शेतकरी कंपन्यांच्या बळकटीकरणातून मूल्यवर्धनाला चालना

Bullock Safety Tips: बैलाच्या वजनानुसार बैलगाडीत किती ऊस भरावा?

Citrus Spider Mite Infestation: लिंबूवर्गीय पिकांवरील जाळी-विणणारा कोळी

Maratha Reservation Protest: मनोज जरांगेंचा मराठा मोर्चा १९ सप्टेंबरला मंुबईत धडकणार

SCROLL FOR NEXT