Amul Milk rate Agrowon
ॲग्रो विशेष

Amul Milk Rate : अमूलच्या दूध विक्री दरात २ रुपयांची वाढ; उत्पादन खर्च वाढल्याने केली दरात वाढ

GCMMF Milk Rate Hike: प्रति लिटर २ रुपयांची वाढ म्हणजे अंदाजे एमआरपीच्या तुलनेत ३ ते ४ टक्के वाढ आहे. ही वाढ सरासरी अन्न महागाईपेक्षा कमी आहे. तसेच दूध उत्पादनाचा खर्च वाढला आहे. त्यानुसार ही किंमत वाढ करण्यात असल्याचा दावाही अमूलने केला आहे.

Dhananjay Sanap

Milk rate : मदर डेअरी पाठोपाठ गुजरात सहकारी दूध संघाने म्हणजेच अमूलनेही दूधाच्या विक्री दरात वाढ केली आहे. देशभरात अमूलच्या दूध पिशवीची किंमत प्रति लिटर २ रुपयांनी वाढवली आहे. १ मेपासून नवीन किंमती लागू केल्या जाणार आहेत, असंही अमूलने स्पष्ट केलं आहे. त्यामागे दुधाची वाढते उत्पादन खर्चाचं कारण असल्याचं सांगितलं जात आहे. 

अमूल याबद्दल अधिकृत प्रसिद्धीपत्रकात सांगितलं आहे की, जून २०२४ नंतर अमूल दुधाच्या किमतीत कोणतीही वाढ झालेली नाही. गेल्या वर्षी, सुमारे ५ महिन्यांसाठी, ग्राहकांना १ लिटर आणि २ लिटरची दूध पिशवी अनुक्रमे ५० मिली आणि १०० मिली अतिरिक्त दूध मोफत देण्याचा लाभ देण्यात आला होता. जानेवारी २०२५ पासून सर्व बाजारपेठांमध्ये १ लिटर पिशवीची किंमत १ रुपयांनी कमी करण्यात आली होती." असंही अमूलने सांगितलं आहे.

प्रति लिटर २ रुपयांची वाढ म्हणजे अंदाजे एमआरपीच्या तुलनेत ३ ते ४ टक्के वाढ आहे. ही वाढ सरासरी अन्न महागाईपेक्षा कमी आहे. तसेच दूध उत्पादनाचा खर्च वाढला आहे. त्यानुसार ही किंमत वाढ करण्यात असल्याचा दावाही अमूलने केला आहे.

अमूल सांगितले की, "दुधाची किंमत वाढ आमच्या ३६ लाख दूध उत्पादकांसाठी दूध उत्पादनाच्या वाढलेल्या खर्चामुळे केली जात आहे. आमच्या सदस्य संघटनांनीही गेल्या वर्षभरात शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या दरांमध्ये याच प्रमाणात वाढ केली आहे." असंही अमूल स्पष्टीकरण दिलं आहे.

अमूलच्या धोरणानुसार, ग्राहकांकडून दूध व दुग्धजन्य पदार्थांसाठी दिल्या जाणाऱ्या प्रत्येक रुपयातील सुमारे ८० पैशे दूध उत्पादकांपर्यंत पोहोचवले जातात. ही दर वाढ शेतकऱ्यांना लाभदायक दर मिळण्यासाठी आणि दूध उत्पादनात वाढ होण्यासाठी मदत करेल,” असे अमूलने स्पष्ट केले. 

या नव्या किंमत वाढीनंतर अमूल फ्रेश पाउच दूधाची किंमत ५० ते ७४ रुपयांच्या राहील. ५०० मि.ली. म्हशीच्या दूधाची किंमत आता ३७ रुपये होणार आहे. तर गोल्ड आणि शक्ती या प्रकारांची किंमत अनुक्रमे ३४ रुपये आणि ३१ रुपये होणार आहे. याच प्रमाणात गाईच्या दूधाचा ५०० मि.लीची पिशवी २९ रुपयांना मिळेल. तर स्लिम अँड ट्रिम प्रकार २५ रुपयांना मिळेल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Exploitation: पवनचक्कीच्या नावाखाली शेतकऱ्यांचा छळ; पोलिसांचाही सहभाग: विधानसभेत विरोधक आक्रमक 

Khandesh Rain Update : खानदेशात पाऊसमान कमी

Sugarcane Payment : कारखानदारांनी थकवले ऊस उत्पादकांचे ९३ कोटी

Tur Sowing : खानदेशात तूर लागवडीत वाढ

Bhojapur Dam : भोजापूर धरण ‘ओव्हर फ्लो’

SCROLL FOR NEXT